मुंबई : शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी योगा करणे हा उत्तम पर्याय आहे. योगामुळे तुम्ही फक्त फीटच राहत नाही तर तुमची आंतरिक शक्ती वाढीस लागते. शिल्पा शेट्टी, अक्षय कुमार, ऐश्वर्या राय हे सेलिब्रेटी आणि अगदी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीनी योगाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. तुम्हीही जाणून घ्या योगाचे विविध प्रकार...


वॉटर योगा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाढत्या उन्हाळ्याच्या तडाख्यात कूल राहण्याचा सोपा मार्ग म्हणजे वॉटर योगा. त्याचबरोबर तुमचा फिटनेसही राखला जाईल. पाण्यात खेळणे ज्यांना आवडते ते योगाची ही स्टाईल अगदी एन्जॉय करु शकता. 



अंटी ग्रेव्हीटी योगा


यात पायलेट्स, डान्स आणि योगा असे तिघांचे कॉम्बिनेशन आहे. यामुळे तुमचे बॅल्नसिंग सुधारेल. तर लवचिकता वाढीस लागेल. संपूर्ण शरीराला यातून उत्तम व्यायाम मिळेल. 



हिप हॉप योगा


योगाचा मजेशीर अंदाज ट्राय करायचा असेल तर तुम्ही योगाची ही स्टाईल ट्राय करु शकता. योगा करताना असणारे म्युजिक अत्यंत एनर्जेटीक असते. ही स्टाईल तरुणाईमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे.



अक्रो योगा


तुम्ही एकावेळी दोन व्यक्तींना एकत्रितपणे योगा करताना पाहिले असेल. एकमेकांच्या साहाय्याने योगाचे विविध प्रकार केले जातात. अक्रो योगामुळे बॉडी टोन्ड होते आणि स्ट्रेंथही वाढते.



पावर योगा


ट्रेडिशनल योगासनांना श्वासाची जोड देत त्याची अनेक आवर्तने करणे हे आहे पावर योगा. वजन कमी करण्यासाठी आणि बॉडी टोन्ड करण्यासाठी हा चांगला पर्याय आहे. 



हॉट योगा


ही स्टाईल देखील इतर योगा स्टाईल्सपेक्षा वेगळी आहे. यात योगा एका हॉट रुममध्ये केला जातो. नेहमीचीच योगासने फक्त ४० डिग्री सेल्सियस तापमानात करायची. याचे अनेक फायदे आहेत.