ब्रेक अप झाल्यावर लोकांमध्ये होतो हा वर्तनबदल
अनेकदा असे लोक स्वत:ला एकटे समजू लागतात
मुंबई: ब्रेक अप ही अनेकांसाठी धक्कादायक गोष्ट. कोणाचेही ब्रेअ अप होणे हे तसे वाईटच. पण, एकदा का ब्रेअ अप झालं आणि त्यातून माणूस हर्ट झाला की, त्याचा त्याच्या वर्तनावर मोठा बदल झालेल्या पहायला मिळतो. अनेकदा असे लोक स्वत:ला एकटे समजू लागतात. या लोकांच्या वर्तनात नेमका काय बदल होतो? याबाबत पुढे आलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टी....
ब्रेकअपमधून बाहेर पडण्यासाठी लोक एक्स व्यक्तीचे इमेल, फोटो, व्हाट्सअप मेसेज डिलीट करणे तसेच आठवण देणाऱ्या गोष्टी नष्ट करू पाहतात.
फेसबुक, फोन, व्हाट्सएप आदी गोष्टींवर एकमेकांना ब्लॉक – अनब्लॉक करण्याचा सिलसिला दोन्ही बाजूंकडून सुरू होतो. हे वातावरण साधारण एक महिना ते काही केसेसमध्ये पूढील काही महिने सुरू राहतो.
ब्रेकअप झाल्यावर अनेक लोक लव्हगुरू होतात. आपला अनूभव समोच्या व्यक्तिशी लाऊन ही मंडळी दुसऱ्याला प्रेम कसे करावे याचे सल्ले देऊ लागतात.
आपल्या पगारातील आर्ध्यापेक्षा जास्त रक्कम लोक कपडे खरेदी किंवा आवडते पर्फ्युम खरेदीवर उडवतात. खरेतर या गोष्टीची त्यांना गरज असते म्हणून नव्हे तर, केवळ टाईमपास आणि काहीसा चेंज म्हणून ही मंडळी या गोष्टी करत असतात.
अनेक लोक स्वत:ला व्यसनांच्या अधिन करतात. काही दारूत डूंबतात. तर, काही कॉम्प्युटरवर गेम खेळत राहतात. काही लोक आपल्या एक्स गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडला रात्रीचे कॉल करता किंवा आपल्या जवळच्या मित्रावर सर्व भडास काढतात.
ज्याच्यासोबत आपला ब्रेकअप झाला आहे त्याच्या नाकावर टिच्चून दूसरा जोडीदार पटवून दाखवण्याचे विचार मनात येतात. त्यासाठी अनेक लोक नव्या जोडीदारासोबत ब्रेकअप झालेल्या व्यक्तिसमोर फिरताना दिसातात.
वरीलपैकी काही गोष्टी एखाद्या व्यक्तित आढळून आल्यास सदर व्यक्तिचा ब्रेकअप झाला आहे, असे समजण्यास हरकत नाही.