मुंबई : हिवाळ्याच्या थंडीत स्किन कोरडी होणं किंवा भेगा पडणे यासारख्या समस्या सर्रास जाणवतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कितीही प्रयत्न केला तरी या थंडीपासून वाचू शकत नाही. या थंडीच्या दिवसांत ऑफिस गोईंग लोकांना जास्त त्रास होतो कारण वातावरणातही गारवा असतो आणि ऑफिसमध्ये एसी. आणि कितीही थंडी असली तरीही तुम्हाला ऑफिसमध्ये हे जावंच लागतं. अशामध्ये तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी घेणं जास्त महत्वाचं आहे. यासाठी काही खास टिप्स 


नारळाचे तेलाला बनवा मॉइस्चरायजर 


नारळाचे तेल हे प्रत्येक स्किनसाठी चांगले असते. याला प्राकृतिक मॉइस्चराइजर देखील बोलू शकतो. त्वचा फाटणे, कोरडी होणे यासाठी तुम्ही नारळाचे तेल लावू शकता. या तेलासोबतच तुम्ही बदामाच्या तेलाचा देखील वापर करू शकता. 


बॅगेत ठेवा सनस्क्रीम 


हिवाळ्यातील उन्ह देखील शरिराला हानीकारक असते. यामुळे जेव्हा पण बाहेर पडाल तेव्हा सनस्क्रीन लावणं जास्त गरजेचं आहे. उन्ह शरिरात जाण्याअगोदर ते लावा त्याने फायदा होईल. 


हँड बॅगेत स्कार्फ आणि ग्लव्स 


थंडीमध्ये केसांची जास्त काळजी घ्या. कोरड्या हवेमुळे केसांची जास्त वाट लागते. यासाठी तुम्ही बॅगेत कायम स्कार्फ किंवा मफलरचा उपयोग करा. तसेच कधीही घराबाहेर पडल्यास सनस्क्रिन सोबत ठेवा. त्यामुळे उन्हात जाण्याअगोदर हे नक्की करा. 


जास्त गरम पाण्याने आंघोळ करू नका 


थंडींच्या दिवसांत खूप जण आंघोळ करणं टाळतात. हे हानिकारक आहेत. तसेच अधिक गरम पाण्याने आंघोळ करणं देखील धोकादायक आहे. त्यामुळे लक्षात ठेवा आंघोळ करण्यासाठी साध्या पाण्याचा वापर करा. भरपूर थंड पाणी आणि गरम पाणी त्वचा कोरडी करतात. 


पाण्याची बॉटल सतत ठेवा सोबत 


हिवाळ्यात तहान कमी लागते मात्र असं असलं तरीही कमी पाणी पिणं गरजेचं आहे. त्यामुळे घरी असताना भरपूर पाणी प्या. आणि घराबाहेर पडताना सोबत पाण्याची बॉटल कॅरी करा. शक्य असल्यास त्या पाण्यात लिंबाच्या रसाचे 2 - 3 थेंब टाका. जेणे करून पचन शक्ती सुधारते. 


टाचांची अधिक काळजी घ्या 


थंडीत टाचांना भेगा पडतात. अशावेळी त्याची अधिक काळजी घ्या. रात्री झोपताना टाचांना तेल किंवा मॉइस्चरायजर लावा. प्रयत्न करा की दिवसभर आणि रात्री झोपताना पायात मोजे घाला. जेणे करून तेल लावल्यास त्यावर धूळ जमा होत नाही. 


ओठांची देखील घ्या काळजी 


थंडीच्या दिवसांत ओठांना देखील भेगा पडतात. अशावेळी ओठांची खास काळजी घ्या. बाजारात अनेक क्रिम उपलब्ध आहे. अन्यथा दुधाची साय उत्तम उपाय आहे.