मुंबई : भारतात हृदयाच्या आजारामुळे जवळपास 1.7 मिलियन म्हणजे 17 लाख लोकांचा मृत्यू होता. या दरम्यान एक धक्कादायक रिपोर्ट हाती आला आहे. रिपोर्टनुसार 95 टक्के लोक ज्यांच्या कानात घाण असते किंवा ज्यांना कानाचा त्रास असतो त्यांना हृदयाचे रोग अधिक होण्याची शक्यता असते.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील डॉक्टर हिम्मतराव बावस्करने 888 रोग्यांवर याचे संशोधन केले आहे. ज्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाब आहे त्यांना याचा त्रास होत असल्याचं समोर आलं आहे. संशोधनात असे समोर आले की, 95 टक्के म्हणजे 508 रोग्यांच्या कानात घाण होती आणि ते हृदय रोगाने पीडित होते. 60 वर्षे उलटलेल्या व्यक्तीच्या कानात घाण असणे हे स्वाभाविक आहे. त्यांना हृदयाचा आजार सर्वाधिक असतो. ही समस्या इतकी सामान्य आहे की, आज प्रत्येक घरातील एक तरी व्यक्ती हृदय रोगाने त्रस्त अससते. 


हृदय रोगाची ही आहेत लक्षणे 


1) अचानक छातीत दुखू लागणे हे हृदयाचा छटका येण्याचे संकेत आहेत. याप्रमाणे आपलं शरीर अनेक संकेत देत असतात. 


2) तुम्हाला एक किवां दोन्ही हातांची दुखापत, कंबर , मान, जबडा किंवा पोटात दुखणे आणि बैचेनी होणे हे जाणवू लागतं. 


3) श्वासाचा त्रास, घाम येणं आणि त्यामुळे त्याचं शरीर थंड होणं, चक्कर येणे हे हृदय रोगाची लक्षणे आहेत. 


4) सतत श्वासाचा त्रास होणे हे हृदयाच्या आजाराची लक्षणे आहेत.