दिल्ली : देशात कोरोनाने थैमान घातलं असून नवे व्हेरिएंट्स देखील सापडू लागले आहेत. तर आता कोरोनानंतर डेंग्यूनेही डोकं वर काढलं असून डेंग्यूचा नवा व्हेरिएंट सापडला आहे. नवीन डेंग्यू व्हेरिएंट DENV-2 च्या ओळखीवर डॉक्टरांनी धोक्याचा इशारा जारी केला आहे. केरळसह 11 राज्यांमध्ये डेंग्यू तापाच्या धोकादायक व्हेरिएंटचा प्रकार आढळला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, डेंग्यू विषाणूचा व्हेरिएंट केस लोडमध्ये भर घालत आहे आणि तो पूर्णपणे प्राणघातक आहे.


नवीन डेंग्यू प्रकार DENV-2 ची ओळख


केरळ, महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तर प्रदेश, ओडिशा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये डासांमुळे होणाऱ्या व्हायरल संसर्गाची पुष्टी झाली आहे. डेंग्यूची काही प्रकरणं साधारणपणे पावसाळ्यात नोंदवली जात असली तरी यावर्षी डासांमुळे होणाऱ्या विषाणूजन्य आजाराशी संबंधित प्रकरणांमध्ये गेल्या दीड महिन्यात लक्षणीय वाढ झाली आहे.


अहवालानुसार, डेंग्यू विषाणू, DENV-2 किंवा D2 स्ट्रेन केवळ प्रकरणांची तीव्रता वाढवत नाही तर अधिक नुकसान देखील करतो. इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चचे बलराम भार्गव यांनी म्हटलं की, हा स्ट्रेन विशेषतः धोकादायक आहे आणि यामुळे मृत्यू होण्याचा धोका अधिक आहे.


प्रामुख्याने हा डेंग्यू विषाणू आहे ज्यामुळे धोकादायक आजार होतो, तो D1, D2, D3 आणि D4 या चार रूपांमध्ये आढळून येतो. DENV संसर्गाचे प्रकार  कोविड सारखे संकेत दर्शवतात. 


तज्ज्ञांचं असंही म्हणणं आहे की, अधिक चिंताजनक डेंग्यू स्ट्रेनच्या उपस्थितीचा अर्थ असा होऊ शकतो की याचा लोकांना यापूर्वी संसर्ग झालेला आहे आणि तो पुन्हा होण्याची शक्यता आहे.