Mumbai Health Survey : मुंबईकरांचं (Mumbaikar) आयुष्य म्हणजे घडाळ्याच्या काट्याप्रमाणे धावण्यासारखं आहे. मुंबईकर काम, नोकरी, धंदा असं सगळं सांभाळतात, मात्र आरोग्याकडे (Health) दुर्लक्ष करताना दिसतायत. नुकत्याच झालेल्या एका सर्व्हेक्षणातून मुंबईकरांना ब्लड प्रेशर (Blood Pressure) आणि कोलेस्ट्रॉलचा (Cholesterol) त्रास असल्याचं दिसून आलंय. मुंबईतील नागरिकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम जाणून घेण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने पुढाकार घेतला आहे. यावेळी आरोग्य संघटनेच्या साहाय्याने मुंबईमध्ये ‘डब्ल्यूएचओ स्टेप्स’ सर्वेक्षण करण्यात आलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जागतिक आरोग्य संघटना यांच्या मार्गदर्शनाखाली, निलसन आईक्यू इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या स्वतंत्र संशोधन संस्थेद्वारे आरोग्य संबंधित माहिती घेण्यात आली. हे सर्व्हेक्षण करण्यासाठी एकूण 5 हजार 950 प्रौढ व्यक्तींशी संपर्क साधण्यात आला होता. यापैकी 5 हजार 199 प्रौढांनी सर्व्हेक्षणात भाग घेतला होता. यात 2 हजार 601 पुरुष आणि 2 हजार 598 महिलांचा समावेश होता.


या सर्व्हेक्षणातून मुंबईतील तब्बल 34 टक्के लोकांमध्ये रक्तदाबाची समस्या दिसून आली. इतकंच नाही तर मुंबईकरांचं कोलेस्ट्रॉल देखील वाढलेलं आहे. सर्व्हेक्षणानुसार, 5 पैकी एका व्यक्तीमध्ये वाढलेल्या कोलेस्ट्रॉलची समस्या पहायला मिळाली. 


आहाराच्या सवयी अपुऱ्या सवयी


फीट राहण्यासाठी दररोज किमान 400 ग्रॅम, फळं आणि भाज्यांचं सेवन केल्यास असंसर्गजन्य आजाराचा धोका कमी होतो. मात्र मुंबईमध्ये सुमारे 94% नागरिक दररोज अपुरी फळे-भाज्या खात असल्याचं सर्वेक्षणात आढळलंय. मुळात हे प्रमाण शिफारस केलेल्या प्रमाणापेक्षा 50 टक्क्यांनी कमी आहे.


आहारात मिठाचा वापर अधिक


जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या शिफारशीप्रमाणे, दैनंदिन जीवनामध्ये मीठाचं सेवन करण्याचं प्रमाण हे 5 ग्रॅम आवश्यक असतं. मात्र याचं प्रमाण अधिक असून ते 8.6 ग्रॅम इतकं आहे.


मुंबईकरांचं कोलेस्ट्रॉल देखील वाढलंय 


या सर्व्हेक्षणानुसार, मुंबईमध्ये सुमारे 21% व्यक्तींना म्हणजेच 5 पैकी एका व्यक्तीचं एकूण कोलेस्ट्रॉल ≥ 190 mg/dl वाढलेलं आढळलंय.


हाय ब्लड प्रेशरचा त्रास


हाय ब्लड प्रेशर मुंबईकरांची पाठ सोडताना दिसत नाही. मुंबईमध्ये 34 टक्के नागरिकांमध्ये रक्तदाब वाढल्याचं दिसून आलंय. तर 72% नागरिक हे सार्वजनिक तसंच खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. मुख्य म्हणजे केवळ 40% नागरिकांचा रक्तदाब नियंत्रणात असल्याची नोंद करण्यात आली आहे.