मुंबई : उन्हाळा आला की उष्णतेपासून लांब राहण्यासाठी लोक AC मध्ये राहातात आणि बराच वेळ AC मध्ये घालवतात. खरंतर AC ची थंड हवा लोकांना उष्ण हवेपासून वाचवते. यांमुळे लोकांना बरं देखील वाटतं. परंतु तुम्हाला माहितीय का, की AC ची ही थंड हवा तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.  होय, जर आपण एसीसमोर बराच वेळ बसलो, तर एसीच्या थंड हवेमुळे आपल्या आरोग्याला अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. आजचा लेख याच विषयावर आहे. आज या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला एसीच्या थंड वाऱ्यामुळे आरोग्याला काय नुकसान होऊ शकते हे सांगणार आहोत.


AC समोर बराच वेळ बसल्याने या समस्या उद्भवतात...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेव्हा आपण AC समोर बराच वेळ बसतो, तेव्हा आपल्या शरीराला शुद्ध हवा मिळत नाही. याचे कारण असे की, आपण एसी चालू करण्यासाठी खिडक्या आणि दरवाजे बंद करतो, त्यामुळे खोलीतील नवीन हवा येण्याची जागा बंद होते. त्यामुळे आपल्या शरीराला ताजी हवा मिळत नाही आणि शरीराची वाढ खुंटते.


एसीसमोर जास्त वेळ बसल्याने सुरकुत्या पडण्याची समस्या उद्भवू शकते. कारण एसीची थंड हवा घाम शोषून घेते. पण त्याच वेळी शरीरातील ओलावाही खेचला जातो, त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता जाणवते आणि त्वचेवर सुरकुत्या दिसू लागतात.


जेव्हा आपण एसीसमोर बराच वेळ बसतो, तेव्हा आपले शरीर खूप थंड होते आणि त्याचा नकारात्मक परिणाम आपल्या हाडांवर देखील होतो. जर तुम्हाला हाडांशी संबंधित कोणतीही जुनी समस्या असेल, तर एसीमध्ये जास्त वेळ बसल्याने ही समस्या उद्भवू शकते.


एअर कंडिशनरमध्ये बसल्याने कमी रक्तदाबाची लक्षणे वाढू शकतात. अशा परिस्थितीत, कमी रक्तदाब असलेल्या व्यक्तीने एसीसमोर मर्यादित वेळ बसावे. कारण जास्त वेळ बसल्याने आरोग्याला हानी पोहोचते.