मुंबई : Acidity झाली की माणूस बेचैन झालाच म्हणून समजा. खाण्याच्या अनियमित वेळा, धकाधकीचं आयुष्य, सततचं बाहेरचं खाणं किंवा मग एखादा आवडीचा पदार्थ मिळाल्यास, त्या पदार्थावर बेचापेक्षा जास्त ताव मारणं या सर्व कारणांमुळे अॅसिडीटीचा त्रास होतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बऱ्याचदा पोट रिकामं असलं, तरीही अॅसिडीटी सतावू लागते. मुद्दा असा, की बरीच औषधं, गोळ्या, उपाय, व्यायाम करुनही काहींची अॅसिडीटी काही केल्या कमी होत नाही. 


मग याच त्रासाला सोबत घेऊन त्याच्या साथीनं पुढे जाण्याचं काम सुरु होतं. पण, तुम्हाला माहितीये का? घरात असणाऱ्या अगदी किरकोळ पदार्थापासून एक चवीची गोष्ट बनवत त्याचं सेवन केल्यासही अॅसिडीटी पळवून लावता येऊ शकते. 


ही गोष्ट म्हणजे साबुदाण्याची खीर. आता तुम्ही म्हणाल की, आम्हाला साबुदाण्यानंही अॅसिडीटी होते. तर, साबुदाणा योग्य पद्धतीनं शिजवून त्याचं सेवन केल्यास तो बादतही नाही आणि त्यामुळं अॅसिडीटीही दूर होते.  (Acidity Sago sabudana khreer benefits)


साबुदाणा शिजवण्याची योग्य पद्धत काय? 
बाधा न होता साबुदाण्याचं सेवन करु इच्छिता आणि अॅसिडीटसुद्धा दूर घालवू इच्छिता, तर त्याची खीर करणं कधीही उत्तम. पण, ही खीर दुधात न शिजवता ती पाण्यात शिजवलेली असावी. कोणताही सुकामेवा न घालता सुगंधासाठी वेलची दाणे घालून ही खीर तयार करावी आणि तिचं सेवन करावं, पोटाला आरामही मिळतो आणि पोटही भरतं. एकदा करुन पाहा हा प्रयोग. 


(वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांतून घेण्यात आली आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही.)