Sidharth Shukla Death: 'बिग बॉस' या रिअॅलिटी शोचा विजेता, अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) याचं गुरुवारी निधन झालं. प्राथमिक स्तरावर समोर आलेल्या माहितीनुसार सिद्धार्थचं निधन हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे अर्थात हार्ट अटॅकमुळे झालं. (Heart Attack)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामान्यत: एका ठराविक वयोगटामध्ये पोहोचल्यावर हृदयाशी निगडीत आजार बळावतात. पण, मागील काही वर्षांमध्ये तरुणाईमध्ये (Heart Attack) नं मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं आहे. फार कमी वयातच हृदयाशी निगडीत विकार जडण्यामागेही काही गोष्टी कारणीभूत आहेत. 


जंक फूड 
जंक फूडमध्ये कॅलरीचं अमाप प्रमाण असतं. ज्यामुळं शरीरारीत कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. जंक फूडचं मोठ्या प्रमाणात सेवन केल्यानं हृदयविकार होण्याचा धोका असतो. 


कामाचा ताण 
व्यस्त जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या अनियमित सवयी ही समस्या युवा पिढीमध्ये बळावू लागली आहे. सातत्यानं काम करण्यासाठीचा ताण, दबाव, बरेच तास एकाच ठिकाणी बसून राहण्याची सवय या साऱ्याचा आरोग्यावर थेट परिमाम करतात. अप्रत्यक्षपणे या साऱ्यामुळं आरोग्यास हानिकारक अशा जंक फूडकडे ओढा वाढतो. स्ट्रेस इटिंग, ओव्हर इटिंगच्या सवयी वाढतात आणि त्यामुळं शरीराचा समतोल बिघडतो. 


स्टेरॉईड
बॉलिवूड किंवा टीव्ही सेलिब्रिटी शरीरयष्टीवर फार काम करतात. अनेक तास ते जीममध्ये घाम गाळतात. यादरम्यान, ते अनेकदा न्यूट्रीशन सप्लिमेंट घेण्यास सुरुवात करतात. यामध्ये एम्बोलिक स्टेरॉईडसारखे प्रकार तुमच्या शरीरावर वाईट परिणाम करु लागतात. तज्ज्ञांच्या मते यामुळं Heart Attack चा धोका वाढतो. 


Siddharth पश्चात शेहनाजची 'ती' बांगडी आता तिला कोण देईल...? पाहा मन हेलावणारा व्हिडीओ .....


 


व्यसनांची सवय 
18 ते 15 वयोगटातील अनेक तरुणांमध्ये धुम्रपान आणि मद्यपानाच्या सवयी बळावलेल्या असतात. डॉक्टरांच्या मते या सवयीसुद्धा Heart Attack ला वाव देतात. या व्यसनांमुळं तरुण पिढी कार्डियोवास्कुलर हार्ट डिसीजची शिकार होते. 


या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका... 
तज्ज्ञांच्या मते कोणीही कार्डियोवास्कुलर हार्ट डिसीज आणि हार्ट अटॅकचं शिकार होऊ शकतं. पण, त्यातही सावधगिरी बाळगत काही लक्षणांकडे दुर्लक्ष न केल्यास संकट टाळता येऊ शकतं. 


झोप न येणे, श्वास घेण्यास अडचण येणे, फार थकवा येणे, हृदयाचे अनियमित ठोके, पाय सूजणे अशी लक्षणं दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. वेळीच सावधगिरी पाळा आणि मोठं संकट टाळा.