मुंबई : झणझणीत खाणाऱ्यांपैकी तुम्हीही एक आहात? तर मग, तुमच्यासाठी एक फायद्याची गोष्ट आहे. ही गोष्ट अर्थातच तुमच्या खाण्याच्या सवयींशीच निगडीत आहे. सहसा आपल्या आहारात, रोजच्या जेवणात मिरची आली की लगेचच ती बाजूला काढली जाते. पण, काहीजण ही तिखट मिरचीही तितक्याच आवडीने खातात. मुख्य म्हणजे भल्याभल्यांना घाम फोडणारी हीच मिरची डाएटमध्ये समाविष्ट केल्यास त्याचे बरेच फायदेही होतात. चला तर मग जाणून घेऊया या तिखट, हिरव्या मिरचीच्या फायद्यांवर...


वजन घटवण्यासाठी उपयुक्त- 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिरव्या मिरच्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्सचं जास्त प्रमाण असून त्यात कॅलरीचं प्रमाण शून्य असल्यामुळे वजन घटवण्यासाठी या घटकांची मदत होते. 


हाडांची बळकटी- 


हाडांच्या बळकटीसाठी हिरव्या मिरचीतील अ जीवनसत्वं उपयोगी ठरतात. इतकच नव्हे, तर त्यामुळे दातही मजबूत होतात. 


रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण- 


मधुमेह झालेल्या अनेकांसाठी हिरव्या मिरचीचं सेवन करणं खूपच फायद्याचं ठरतं. हिरव्या मिरच्यांमध्ये असणाऱ्या घटकांमुळे रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. 


मूड स्विंग-


हिरव्या मिरच्यांच्या सेवनामुळे एंडोर्फिन नावाचं रसायन तयार होतं. ज्यामुळे वेळोवेळी बदलणाऱ्या मानसिक स्थिती किंवा मूड स्विंगवर अधिकाधिक प्रमाणात नियंत्रण ठेवता येतं. 


रक्तस्त्राव थांबवण्यास उपयुक्त


एखादी जखम झाल्यास आणि त्यातून खूप रक्तस्त्राव होत असल्यास तिखट पदार्थ किंवा हिरव्या मिरच्यांचं सेवन करणं फायद्याचं ठरतं. हिरव्या मिरच्यांमध्ये व्हिटामिन के चं प्रमाण जास्त असल्यामुळे रक्तस्त्राव थांबवण्यास त्याची मदत होते.