Blood Sugar Level: मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांचे पथ्यपाणी व आहारावर लक्ष देणे खूप गरजेचे असते. कारण काही पदार्थांमुळंही ब्लड शुगरवर थेट परिणाम होतो. त्यामुळं रोजचा तुमचा डाएट प्लानमध्ये या गोष्टींची काळजी घेण्याची गरज आहे. अन्यथा तुमच्या शरीरातील ब्लड शुगरची मात्रा अनियंत्रीत होईल. मधुमेह असताना डाएट योग्य प्रमाणात घेतल्यास त्यावर नियंत्रण मिळवणे शक्य होऊ शकते. तुम्ही चपाती किंवा भात जरी खाल्ला तरी या काही सोप्प्या ट्रिक्सने तुम्ही ब्लड शुगरची मात्रा नियंत्रणात ठेवू शकता. चपाती बनवण्याच्या आधी जेव्हा तुम्ही रोज पीठ मळता तेव्हा फक्त त्यात तीन गोष्टी मिसळा तुमची ब्लड शुगर लेव्हल नेहमी नियंत्रणात राहिल. 


गव्हाच्या पीठात या तीन गोष्टी मिसळा आणि ब्लड शुगर नियंत्रणात ठेवा 


1. गव्हाच्या पीठात मेथीचे दाणे 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेथीच्या दाण्यामुळं मधुमेह नियंत्रण ठेवण्यास मदत होते. त्यामुळं गव्हाच्या पीठात मेथीचे दाणे टाकल्यास तुमचे जेवण लो ग्लायसेमिक इंडेक्स असलेले होते. जे खाल्ल्यामुळं ब्लड शुगर लेव्हल वाढण्याची मात्रा कमी होते. 


2. चण्याचे पीठ 


गव्हाच्या पीठात बेसन मिसळल्याने पीठात प्रोटीनचा स्त्रोत निर्माण होतो. ज्यामुळं तुमची ब्लड शुगर मात्रा नियंत्रणात राहते. 


3. काळी मिरी आणि हळद


काळी मिरी आणि हळद यात विशेष गुण असतात जे मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. पीठात चिमूटभर काळी मिरी किंवा हळद टाकल्यास पीठात प्रोटीन आणि अँटीऑक्सिडेंट्स निर्माण होतात. 


4. मुग डाळीचे पीठ 


मुग डाळीमध्ये प्रोटीन आणि फायबरचा स्त्रोत अधिक असतो. जे ब्लड शुगर लेव्हला नियंत्रणात ठेवतात. त्यामुळं पीठात मूग डाळीचे पीठ टाकल्यास ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहण्यास मदत होते आणि तुमचे पोटही भरलेले राहते. 


5 अक्रोड आणि बदाम पावडर 


अक्रोड आणि बदाममध्ये चांगले प्रोटीन, व्हिटॅमिन आणि मिनरल्स असतात जे मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. पीठात या दोन ड्राय फ्रुट्सची पावडर टाकून तुम्ही तुमची चपाती पौष्टिक बनवू शकता. 


मधुमेहाच्या रुग्णांनी काय काळजी घ्यावी?


मधुमेहाच्या रुग्णांनी साखर असलेले पदार्थ कमी करण्याची गरज आहे. साखर बंद केलेली असतानाही योग्य प्रमाणात व योग्य आहार घेतला पाहिजे. अन्यथा रक्तातील साखर एकदम कमी होण्याची शक्यता होते. त्यामुळं चक्कर येणे, गरगरणे यासारखे प्रकार घडू शकतात.  


(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)