Health News : काही लोकं आयुष्यात खूप अस्वस्थ असतात. कारण ते जेव्हा ही हातात मोबाईल घेतात तेव्हा ते सरळ अडल्ट साईटवर जातात. कारण त्यांना बोल्ड कंटेंट बघण्याचं व्यसन लागतं. असं अनेकांच्या बाबतीत होऊ शकतं. भारतात पॉर्नसाईट पाहणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अडल्ट साइट मोबाइलवर गुप्तपणे उघडल्या जातात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पॉर्नशी प्रेम आणि द्वेष असे नाते आहे. आजच्या नंतर कधीच पाहणार नाही असं वाटतं आणि मग परत तिकडेच जातो. डिजिटल दुनियेत बोल्ड कंटेंट वाढत चालला आहे. लैंगिक जीवनास देखील कधी कधी तो फायदेशीर ठरत असला तरी त्याचं व्यसन कधी लागू शकतं हे सांगता येत नाही. त्यामुळे ते समजून घेणे महत्त्वाचे आहे. 


पॉर्न पाहण्याच्या सवयीमुळे तुमची दिनचर्या, सेक्स लाईफ आणि झोप यावर गंभीर परिणाम होत असतो. म्हणजेच तुम्हाला याचे व्यसन लागलेले असते.


काही लोक थ्रिलसाठी पॉर्न पाहतात तर काही लोक आरोग्यविषयक माहिती गोळा करण्यासाठी त्या साईटवर जातात. पण जेव्हा ते व्यसन बनते तेव्हा ते मानसिक आरोग्यास हानी पोहोचवू लागते. तज्ज्ञ डॉक्टर सांगतात की, पॉर्न अॅडिक्शनचा समावेश मानसिक विकारात होऊ शकत नाही. पण तुमचे पॉर्न साइट्स पाहण्याचे व्यसन आहे की नाही हे शोधून काढले पाहिजे.


व्यसन कसे शोधायचे?


पॉर्न अॅडिक्शनला मानसिक विकार म्हणता येणार नाही. पण तुमचे पाहण्याचे व्यसनात रुपांतर तर झाले नाही ना हे शोधणे महत्त्वाचे आहे.


पोर्नोग्राफीकडे कधी लक्ष देण्याची गरज आहे


पोर्नोग्राफी ही नेहमीच समस्या राहिली आहे. त्यावरही वाद झाला आहे. हे वैयक्तिक पसंती आणि वैयक्तिक निवडीवर अवलंबून असते. पॉर्न पाहण्याची सवय कालांतराने वाढत आहे. पाहिल्यानंतर तो गिल्टमध्ये सापडतो. जबाबदाऱ्यांपासून दूर पळतो आणि झोपेचा त्रास होतो. तुमची इच्छा नसतानाही तुमचा पार्टनर तुम्हाला पॉर्न फँटसीमध्ये साथ देईल अशी अपेक्षा तुम्ही करू लागता.



अश्लील व्यसन कसे टाळावे


जर खूप पॉर्न पाहण्याची इच्छा असेल तर स्वतःला इतर कामात व्यस्त ठेवा.
याचा तुमच्या जीवनावर किती परिणाम झाला आहे हे नेहमी लक्षात ठेवा.
जर्नल किंवा डायरीमध्ये पोर्नोग्राफीचे तोटे लिहा. ते वेळोवेळी वाचत राहा.
जर नियंत्रण नसेल तर तज्ञाशी बोलून सल्ला घ्या.