मुंबई : उन्हाळा आला की, एअर कंडिशनरचा वापर वाढतो. घरात आता एसी लावणं हे सामान्य गोष्ट झाली आहे. तापमानात वाढ होताच लोकं एसी लावून बसतात. पण विश्रांतीचे हे दोन क्षण तुमच्यासाठी किती हानिकारक आहेत हे तुम्हाला माहीत आहे का? (Side effect of Air conditioner)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज घरापासून गाडीपर्यंत सर्व काही वातानुकूलित झाले आहे. अशा परिस्थितीत तुम्ही दिवसातील अनेक तास फक्त एसीमध्ये घालवता. एसीमध्ये सतत बसल्याने उष्णतेपासून आराम मिळत असला तरी दुसरीकडे यामुळे आपली गैरसोयही होऊ शकते.


सांधे दुखी


एसीमुळे अनेकांना सांधेदुखीचा त्रास सुरू होतो. ही समस्या भविष्यात हाडांशी संबंधित गंभीर आजारांनाही जन्म देऊ शकते.


ताप किंवा सर्दी


एसी सुरू असलेल्या ठिकाणी जास्त वेळ बसून राहिल्याने अनेकांना सर्दी, तापही येतो. विशेषतः बाहेर खूप गरम असेल तर या थंड-उष्ण वातावरणातून आजारी पडण्याची शक्यता वाढते. त्यामुळे सतत एअर कंडिशनरमध्ये राहू नका.


त्वचा कोरडी पडणे


एसी तुमच्या शरीराला डिहायड्रेट करते. ती त्वचेतील ओलावा बाहेर काढते. यामुळेच एसीमध्ये जास्त वेळ घालवल्यामुळे त्वचा कोरडी होते. एसीमध्ये जास्त वेळ बसत असाल तर पुरेसे पाणी पिण्यास विसरू नका.


मेंदूच्या आरोग्यावर वाईट परिणाम


जेव्हा एसीचे तापमान खूप कमी होते, तेव्हा मेंदूच्या पेशीही आकसतात, ज्यामुळे मेंदूच्या क्षमतेवर आणि कार्यक्षमतेवर परिणाम होतो. इतकेच नाही तर तुम्हाला सतत चक्कर येण्याची समस्या देखील होऊ शकते. अनेकांना डोकेदुखीची तक्रारही असते.


लठ्ठपणा


एसीचा अतिवापर तुम्हाला लठ्ठपणाचा बळी बनवू शकतो. कमी तापमानामुळे आपले शरीर अधिक सक्रिय राहू शकत नाही आणि शरीरातील ऊर्जा योग्य प्रमाणात वापरली जात नाही. त्यामुळे शरीरातील चरबी वाढते.