दिल्ली : सध्या देशाची राजधानी दिल्ली हवा प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. दिल्लीत इतक्या प्रमाणात प्रदूषण आहे की आजूबाजूच्या परिसरात देखील प्रदूषणाचा त्रास होतोय. गेल्या काही दिवसांमध्ये इथे असलेल्या फॅक्टरीच्या माध्यमातून विषारी वायू, धूर, धूळ, कचरा तसंच गाडीतून निघणार धूर यांमुळे शहरात स्मॉगचं प्रमाण वाढतंय. हे स्मॉग मानवी शरीरासाठी धोकादायक आहे. मात्र तुम्हाला माहितीये का हा स्मॉग तुमचं सेक्स लाईफ बर्बाद करतंय.


रिसर्च काय सांगतो?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार असं समोर आलंय की, गाड्यांमधून निघणारा विषारी वायू यांचा संबंध इरेक्टाइल डिसफंक्शन (Erectile dysfunction)शी जोडण्यात आला आहे. इरेक्टाइल डिसफंक्शन एक अशी समस्या ज्यामध्ये पुरुषांच्या स्पर्म्सची संख्या कमी कमी होत जाते. याचा थेट परिणाम सेक्स लाईफवर होताना दिसतो. 


टेस्टोस्टेरोन आणि एस्ट्रोजन हार्मोन होतात स्मॉगमुळे प्रभावित


तज्ज्ञांनी त्यांच्या संशोधनात असं म्हटलंय की, प्रदूषण, टेस्टोस्टेरोन आणि एस्ट्रोजन हार्मोनच्या पातळीमध्ये संबंध दिसून आलाय. हे दोन्ही हार्मोन स्त्री-पुरुषांच्या लैंगिक क्षमता तसंच फर्टिलीटी प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतात.


या संशोधनावरून आता हे स्पष्ट झालंय की, प्रदूषणाचा मानवाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो असं नाही तर याचा परिणाम लोकांच्या लैंगिक संबंधांवरही होतो. दरम्यान याबाबतचा इशारा तज्ज्ञांकडून अनेक दिवसांपासून देतायत. प्रदूषणामुळे लैंगिक संबंधांवर परिणाम होतो तसंच वंध्यत्वही येऊ शकतं, असंही या नवीन अभ्यासातून समोर आलंय.


2019 मधील एका संशोधनात, विषारी गाडीच्या धुराच्या संपर्कात आल्या, इरेक्टाइल डिसफंक्शनची अनेक प्रकरणं नोंदवली गेलीयेत. जर्नल ऑफ सेक्शुअल मेडिसिनमध्ये पब्लिश झालेल्या एका संशोधनात असं दिसून आलंय की, प्रदूषित विषारी पार्टिकल्स शरीरात गेल्याने रक्तवाहिन्यांना त्रास होतो. यामुळे ऑक्सिजन प्रजनन करणाऱ्या अवयवांपर्यंत पोहोचत नाही. ज्यामुळे पुरुषांच्या लैंगिक उत्तेजनाच्या क्षमतेवर परिणाम होताना दिसतो.