Air Purifying Plants : थंडी आता हळूहळू वाढू लागली आहे. देशात बऱ्याच ठिकाणी धुक्याची चादर पसरली आहे. हिवाळ्यात 3 महिने धुक्यामुळे हवा विषारी राहते. लोकांना उघड्यावर जाऊन नीट श्वासही घेता येत नाही. प्रदूषणामुळे हृदयविकाराचा झटका, दमा, पक्षाघात आणि श्वसनाचे आजारही वाढत आहेत. प्रदूषण कमी करण्याचं काम झाडे करत असतात. काही झाडे मोठ्या प्रमाणात ऑक्सीजन देतात. आज आम्ही तुम्हाला 5 वनस्पतींबद्दल सांगणार आहोत. जे हवा स्वच्छ करण्याचे काम करतात.


तुळशी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुळशी ही एक औषधी वनस्पती आहे. जी सहसा अनेकांच्या घरात दिसते. तुळशीची पाने हवेतील विषारी घटक शोषून घेतात आणि त्याचे ऑक्सिजनमध्ये रूपांतर करतात. हे रोप भांड्यात कुठेही लावता येते.


स्नेक प्लांट


हिवाळ्यात स्नेक प्लांट देखील खूप प्रभावी मानले जाते. या वनस्पतीचे वैशिष्ट्य म्हणजे ते दिवसा आणि रात्री दोन्ही वेळी ऑक्सिजन तयार करते. या रोपाची लागवड करून तुम्ही २४ तास शुद्ध हवेचा आनंद घेऊ शकता.


कोरफड


कोरफड हवेतील हानिकारक बेंझिन आणि फॉर्मल्डिहाइड वेगळे करते. या वनस्पतीच्या 200 हून अधिक जाती बाजारात विकल्या जातात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि गरजेनुसार कोणतीही वनस्पती घेऊ शकता. सूर्यप्रकाश चांगल्या प्रमाणात येतो अशा ठिकाणी हे रोप लावणे फायदेशीर ठरते.


अरेका पाम


वायू प्रदूषणाविरूद्धच्या लढाईत अरेका पाम वनस्पती देखील खूप फायदेशीर मानली जाते. ही वनस्पती धुक्यात आढळणाऱ्या टोल्युइन नावाच्या विषारी पदार्थापासून प्रभावीपणे संरक्षण करते. हे रोप कमी उन्हाच्या ठिकाणी सहज लावता येते आणि त्याला पाणीही कमी लागते.


मनी प्लांट


मनी प्लांट साधारण घराच्या आर्थिक परिस्थितीशी निगडीत असतो. पण हवा शुद्ध करणारी वनस्पती म्हणून देखील त्याची भूमिका आहे. या वनस्पतीची पाने हृदयाच्या आकाराची असतात. संध्याकाळी, ही वनस्पती ऑक्सिजन सोडण्यास सुरवात करते, ज्यामुळे आपल्याला घरात स्वच्छ आणि शुद्ध हवा मिळते.