आलिया भट्ट आपला मेट गाला 2024 च्या लूकमुळे चर्चेत आहे. परदेशात आपली भारतीय संस्कृती जपत Met Galal मध्ये साडी परीधान करुन वेगळेपण जपलं. चिमुकल्या राहाची आई असलेली आई आपल्या सौंदर्यामुळे अतिशय वेगळी दिसत होती. आलियाने वयाच्या 29 मध्ये राहाला जन्म दिला. आई होण्यासाठी कोणतं वय योग्य असं विचारलं जातं तेव्हा ते तिशीच्या आत असल्याच तज्ज्ञ सांगतात. तिशीच्या आत बाळ होण्याचे फायदे काय? समजून घ्या. 


तिशीमध्ये आई होण्याचे फायदे 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लहान वयात माता झालेल्या बहुतेक महिलांकडे जर तुम्ही लक्ष दिले तर त्या इतर सर्व स्त्रियांपेक्षा जास्त सक्रिय, निरोगी आणि उत्साही असतात. प्रजनन शक्ती 20 ते 30 वर्षांच्या वयात जास्तीत जास्त असते. त्यामुळे या वयात गर्भधारणा करणे सहज शक्य होते आणि त्याचप्रमाणे प्रसूतीनंतर बरे होणे सोपे जाते आणि गर्भपाताचा धोकाही कमी असतो. यासोबतच बाळाचा पोटातही चांगला विकास होतो. म्हणूनच, गर्भधारणेसाठी 30 पूर्वीचे वय चांगले मानले जाते.


तिशीमध्ये मातृत्व


30 च्या दशकात पालक बनण्याचा ट्रेंड झपाट्याने वाढला आहे. बऱ्याचदा, करिअर आणि कुटुंबातील संघर्षामुळे, जोडपे त्यांच्या तिशीच्या आत पालक बनणे निवडतात. ज्या स्त्रिया त्यांच्या शिक्षण, करिअर किंवा इतर वैयक्तिक कारणांमुळे त्यांच्या 30 वर्षाच्या अगोदर गर्भधारणेची निवड करतात त्या मातृत्वाचा अनुभव घेण्यास तितक्याच सक्षम असतात. या वयात स्त्रियांमध्ये प्रजनन क्षमता चांगली असते.


स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो. ज्या महिला वयाच्या तिशीत किंवा त्या अगोदर गर्भधारणेचा पर्याय निवडतात त्यांना स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो. यामागील प्रमुख कारण म्हणजे बाळाला स्तनपान करणे.
कमी तणाव जाणवतो. ज्या स्त्रिया त्यांच्या 30 च्या पूर्वाधात गर्भधारणा करतात त्यांना कमी ताण होतो. कारण या वयापर्यंत ती स्त्री देखील ऍक्टिव असते. त्यांच्या 30 च्या दशकात माता झालेल्या स्त्रियांपेक्षा पालकत्वाचा ताण कमी होतो. यावेळी शारीरिक किंवा मानसिक क्षमतेमुळे त्यांच्याकडे पालकत्वाची क्षमता उत्तम राहते. 
भ्रूण किंवा अंडी उत्तम राहतात. जर एखादी स्त्री तिच्या गर्भधारणेचा विचार या वयात करत असेल तर तिच्या शरीराचा पोत उत्तम असतो. त्यामुळे गर्भ आणि अंडी याकाळात उत्तम क्वालिटीचे असतात. यामुळे गर्भधारणा सहज राहणे फायदेशीर होते. 


(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)