Almond Peel Benefits : अमुक एक तास बदाम पाण्यात भिजवल्यानंतर त्याची साल काढून बदामांचं सेवन करण्याला अनेकांचच प्राधान्य असतं. पण, प्रत्यक्षात बदामापेक्षा त्याच्या सालीमध्येच सर्वाधिक पोषक तत्त्वं असतात हे माहितीये का? जाणून आश्चर्य वाटेल, पण बदामाच्या सालींमध्ये विटामिन, मिनरल आणि अँटीऑक्सिडंट तत्त्वं असतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बदामाच्या सालीमध्ये असणाऱ्या या घटकांमुळं आरोग्य, त्वचा आणि केसांना फायदा होतो. त्यामुळं बदाम पाण्यात भिजवून ते सोलल्यानंतर त्याची सालं चुकूनही फेकू नका किंवा बदामाची साल न काढता सालीसमवेत त्यांचं सेवन करा. 


जाणून घ्या बदामाच्या सालीचे फायदे...


उत्सर्जन क्रियेत मदत 


बदामाची करड्या रंगाली साल तंतुमय घटकांनी परिपूर्ण असते. ज्यामुळं आतड्यांमध्ये चांगल्या बॅक्टेरियांची वाढ होऊन शरीराला फायदा मिळतो. बदमाच्या वाळलेल्या साली, आळशी, टरबूजाच्या बिया आणि साखर हे मिश्रण एकत्र करून दुधात मिसळून प्यायल्यास शरीरातील उत्सर्जन प्रक्रिया योग्य रितीनं सुरू राहते. 


हेअरमास्क 


अर्था कप बदामाची सालं, 1 अंड, 1 चमचा नारळाचं तेल, 2 मोठे चमचे अॅलोवेरा जेल आणि मध हे मिश्रण एकजीव करून घ्या. गाळणीनं गाळून हे मिश्रण केसांवर लावा. ज्यामुळं ही प्रक्रिया हेअर स्पासारखं काम करेल. 


हेसुद्धा वाचा : Olympics 2024 : रात्रभर न झोपता सायकलिंग, दोरीच्या उड्या अन्...; आदल्या रात्री विनेश फोगटसोबत नेमकं काय घडलं? 


उत्तम स्नॅक 


बदामाच्या साली उन्हात किंवा मायक्रोवेवमध्ये कोरड्या करून घेत त्यात ऑलिव्ह ऑईल, लसूण पूड, कांदा पूड, अर्धा चमचा पॅपरिका पावडर आणि चवीनुसार मीठ असे पदार्थ मिसळावेत आणि 5 ते 10 मिनिटं बेक करावं. जेणेकरुन या साली कुरकुरित होऊन त्यांचं सेवन करता येतं. हा एक उत्तम, कुरकुरत आणि चटपटीत पदार्थ ठरतो.


विविध रुपांमध्ये बदामाच्या सालींचे फायदे असून, त्या सालींचा दैनंदिन जीवनात वेगवेगळ्या रुपात समावेश करता येतो. अशा या बहुगुणी बदामाच्या सालीचं सेवन तुम्ही करणार ना?