Almonds : बदाम हा Cholesterol - Diabetes चा शत्रू, एम्सच्या डॉ. ने सांगितले 5 जबरदस्त फायदे
How many almonds to eat daily : बदाम हे स्मरणशक्तीसाठी चांगले असतं हे अनेकांना माहिती आहे. पण बदाम खाण्याचे इतर फायदे तुम्हाला कळले तर तुम्ही रोज बदाम खाणार नक्की. एम्सच्या डॉक्टरने बदाम हा कोलेस्ट्रॉल-मधुमेहाचा शत्रू असं सांगितलं आहे.
Health Benefits of Almonds : सुका मेवा (dry fruits) ही आपलं अवेळी लागली भूक घालविण्यासाठी उत्तम पदार्थ आहे. ऑफिसमध्ये काम करणाऱ्या अनेकांजवळ सुका मेव्याचा छोटासा डबा असतो. अनेक जण गाडीतही सुका मेवा ठेवतात. कारण भूक भागविण्यासाठी तो कामी येतो. त्याशिवाय या सुका मेव्यामुळे तुम्हाला लगेचच शक्ती मिळते. त्यामुळे डॉक्टरांपासून आहारतज्ज्ञांपासून सगळे जण सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. सुका मेव्यामध्ये काजू, पिस्ता, बदाम, बेदाणे, अंजीर, खजूर यांसारखे ड्रायफ्रुट्स आणि नट्स हे जेवढे चविष्ट आहेत, तेवढंच आरोग्यासाठीही त्यांचे अनेक फायदे आहेत. या सर्व गोष्टींचं स्वतःचं वेगवेगळे गुणधर्म आणि फायदे (Properties and benefits) आहेत, पण बदाम ही एक अशी गोष्ट आहे जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खायला आवडते आणि हे खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. (almonds benefits to control cholesterol diabetes and cancer dr video Health news in marathi)
बदाम कच्चा, भिजवून खाल्ला जातो. शिवाय बदामाचे पीठ, तेल अगदी बदामाचे दूध असे अनेक प्रकारे आपण बदामाचे सेवन करतो. एकंदरीत मुद्दा असा आहे की तुम्ही बदाम कोणत्याही प्रकारे खाल्ल्यास तुम्हाला फायदा होईल. बदाम खाण्याचे आरोग्यासाठी होणाऱ्या फायद्यांबद्दल दिल्लीच्या प्रसिद्ध हॉस्पिटल एम्सच्या डॉक्टर यांनी सांगितलं आहे. बदाम हा कोलेस्ट्रॉल-मधुमेहाचा शूत्र असल्याचं त्या म्हणायल्या आहेत.
बदाममध्ये ही पोषकतत्त्वं असतात
बदाम हे एक असे ड्राय फ्रूट आहे ज्यामध्ये शरीराला फायदेशीर असलेले सर्व पोषक तत्व आढळतात. बदामामध्ये निरोगी चरबी, अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. फायबर, प्रथिने, व्हिटॅमिन ई, मॅंगनीज, मॅग्नेशियम असतात. हे प्रथिने, लोह, तांबे, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन बी 2 चा देखील चांगला स्रोत आहे. दिल्ली एम्समधील न्यूरोलॉजिस्ट डॉ. प्रियंका शेरावत तुम्हाला बदाम खाण्याचे फायदे सांगितले आहेत. (Good dietary fiber content)
अँटीऑक्सिडंटचं भांडार (Antioxidant)
डॉक्टरांनी सांगितले की बदाम हे अँटीऑक्सिडंटचे भांडार आहे. अँटिऑक्सिडंट्स ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण करण्यास मदत करतात. ज्यामुळे तुमच्या पेशींमधील रेणूंचं नुकसान होऊ शकतं. जळजळ, वृद्धत्व आणि कर्करोगासारखे रोग होऊ शकतात. शिवाय बदामामुळे व्हिटॅमिन-ई (Rich in Vitamin E) मोठ्या प्रमाणात मिळतं. हे चरबीमध्ये विरघळणारे अँटिऑक्सिडंटचं कुटुंब आहे. हे अँटिऑक्सिडंट्स तुमच्या शरीरातील पेशींच्या पडद्यामध्ये तयार होतात आणि पेशींना ऑक्सिडेटिव्ह तणावापासून वाचवतात. लक्षात ठेवा की व्हिटॅमिन-ईचे सेवन केल्याने हृदयविकार, कर्करोग आणि अल्झायमर रोगाचा धोका कमी होण्यास मदत होते.
कोलेस्ट्रॉलचा शत्रू (Cholesterol)
रक्तामध्ये आढळणारे खराब कोलेस्ट्रॉल (Lowers bad cholesterol that is LDL) हृदयविकाराचा (heart disease) धोका वाढवतो. नियमितपणे बदाम खाल्ल्याने हे वाईट कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. बदाम रक्तातील एलडीएल प्रभावीपणे कमी करू शकतो. बदामामध्ये मोठ्या प्रमाणात मॅग्नेशियम असते आणि हे पोषक घटक रक्तदाब पातळी कमी करण्यास मदत करतात. लक्षात ठेवा की उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा झटका, पक्षाघात आणि मूत्रपिंड निकामी होतात.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी बदाम उत्तम (Diabetes)
बदामामध्ये कर्बोदकांचे प्रमाण कमी असते परंतु निरोगी चरबी, प्रथिने आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. यामुळेच मधुमेहाच्या रुग्णांसाठी बदाम हा उत्तम पर्याय आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यामध्ये मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते आणि हे पोषक तत्व रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवते. एवढंच नाही तर हा घटक इन्सुलिनचे कार्यही सुधारतो.