मुंबई : कोरफडीचे आयुर्वेदात अनेक फायदे सांगितलेत. यात मोठ्या प्रमाणात व्हिटामिन आणि प्रोटीन असतात. याचा ज्यूस प्यायल्याने शरीरास डबल फायदे होतात. ज्यूस पिण्यास थोडासा कडवट असतो . हा ज्यूस प्यायल्याने २०० प्रकारचे आजार दूर होतात. कोरफडीचा ज्यूस बॉडीला डिटॉक्सही करतोय. यात मोठ्या प्रमाणात अँटी ऑक्सिडंट असतात. ज्यामुळे शरीरातील अनेक आजार दूर करतात. हा ज्यूस प्यायल्याने शरीरातील प्रतिकारक क्षमता वाढते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर तुमचे वजन अधिक आहे आणि ते कमी करायचे आहे तर सकाळी रिकाम्या पोटी कोरफडीचा ज्यूस प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. सकाळी रिकाम्या पोटी कोरफडीचा रस प्यायल्याने खराब ट्रान्सफॅट बाहेर पडते. पचनक्रिया वाढते. यामुळे वजन आपोआप कमी होते.


बॉडी डिटॉक्स करण्यासाठी कोरफडीचा ज्यूस फायदेशीर


शरीरासाठी कोरफडीचा रस हा डिटॉक्सिफिकेशन करणारा पदार्थ आहे. आपल्या शरीरात अनेक विषारी पदार्थ असतात जे स्कीनला खराब करतात. तसेच बॉडी सिस्टीमवर प्रभाव टाकतात. कोरफडीचा ज्यूस प्यायल्याने पोटातील विषारी पदार्थ दूर होतात. तसेच ताजेतवानेही वाटते. शरीराला मजबूती मिळते. सकाळी रिकाम्या पोटी कोरफडीचा ज्यूस प्यायल्याने शरीरातील मेटाबॉलिज्म २४ टक्क्यांनी वाढते.


अनेकदा शरीरात पाण्याची कमतरता असल्यास डोकेदुखी सुरु होती. तुम्हालाही ही समस्या असेल तर सकाळी रिकाम्या पोटी कोरफडीचा रस प्या. यामुळे शरीरातील रक्त वाढते. रिकाम्या पोटी कोरफडीचा रस प्यायल्याने लाल रक्तपेशी वाढतात. याशिवाय पोट साफ राहते. जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास आहे तर तो दूर होतो.