Benefits Of Alum: तुरटी जवळजवळ प्रत्येक घरात आढळते. कारण तुरटीचे अनेक आश्चर्यकारक फायदे आहेत. पाणी शुद्ध करण्यासाठी सामान्यपणे तुरटीचा वापर केला जातो. तुरटीचा अॅन्टीबॅक्टेरियल असल्यामुळे इनफेक्शन कमी करण्यास मदत होते आणि लवकर आराम मिळतो.  या व्यतिरिक्त आरोग्य आणि सौंदर्य वाढवण्यासठी तुरटीचा अनेक प्रकारे वापर केला जातो. तुरटी म्हणजे हायड्रेटेड पोटॅशियम अॅल्युमिनियम सल्फेट K2SO4.Al2(SO4)3.24H2O यांच्या सयूंगाला तुरटी असे म्हणतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रक्ताभिसरणासाठी


तुरटी आणि सेंधव मिठाच्या औषधी गुणधर्मांबद्दल माहिती आहे. त्यामुळे आंघोळीच्या पाण्यात थोडी तुरटी आणि थोडं सैंधव मीठ टाका. रक्ताभिसरण बरोबर ठेवण्यासोबतच शरीराचा थकवाही दूर होतो.


तुरटी जखमेवर गुणकारी


कोणत्याही दुखापतीमुळे शरीरातून जास्त प्रमाणात रक्तस्राव होत असेल तर त्या जागेवर तुरटी चोळावी. त्यामुळे रक्त येणे लगेच थांबते. 


चेहऱ्यावर लावल्यानेही होतो फायदा


तुरटी चेहऱ्यावर लावल्यानेही फायदा होतो. ज्यांना चेहऱ्यावर डागांचा त्रास होत असेल त्यांनी चेहऱ्यावर तुरटी लावली तर गुणकारी सिद्ध होते. तसंच त्वचेवरील तेलकटपणा दूर होण्यास मदत होते.


टाचांना पडलेल्या भेगा


जर तुमच्या टाचांना भेगा पडत असतील तर तुरटी तुम्हाला खूप आराम देईल. पाण्यात तुरटी गरम करा की ती वितळते आणि फेस बनते, नंतर तो फेस थंड झाल्यावर, टाचांवर पडलेल्या भेगांवर लावा. तुम्हाला लगेच आराम मिळेल.