Alzheimer's Disease : अगदी काहीच क्षणापूर्वी केलेली एखादी गोष्ट पटकन विसरणं. एखादं काम हाती घेतलंय, मात्र पुढच्याच सेकंदात आपण काय करतोय हे विसरुन जाणे.. अशी लक्षण दिसत असतील तर तुम्हाला तातडीने डॉक्टरकडे जाणं गरजेचं आहे. कारण स्मृतीभ्रंश म्हणजेच अल्झायमर आजारासोबत तुमची मैत्री सुरु होतेय याचीच ही लक्षणं आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माणसाने कोरोनावर मात करण्यात यश मिळवलं. तरी कोरोनाच्या लाटेचे धोके काही संपलेले नाहीत.  कारण कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये आता दिसतायत अल्झायमरची लक्षणे. ज्यांना कोरोना झाला अशा 20 टक्के लोकांना अल्झायमरने आपल्या कवेत घेतलंय.  कोरोना झालेल्यांना अल्झायमरचा विळखा पडतोय. 


अल्झायमरची लक्षणं काय? (Symptoms Of Alzheimer's disease)


विसरभोळेपणा, तारखा किंवा घटना विसरणे, छोट्या छोट्या गोष्टी विसरणे, नवीन गोष्टी शिकण्यात अडचण, घराचा पत्ता विसरणे, नातेवाइकांची नावे विसरणे, काम करताना विसराळूपणा, विचार करण्याची क्षमता कमी होणे, असे प्रकार दिसून येतात.


अल्झायमर असा आजार आहे जो चटकन लक्षात येत नाही. त्याची लक्षणं अनेकांना पटकन कळत नाही. रात्रभर झोप न येणे. अस्वस्थ वाटत राहणे.  या गोष्टी सामान्य वाटतात. मात्र पुढे जाऊन त्याचं रुपांतर आधी डिमेन्शियात नंतर अल्झायमरमध्ये होऊ शकतं.. 


अल्झायमरची कारणं काय? (Causes  Of Alzheimer's disease)


उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉलचं वाढतं प्रमाण, मधूमेह, व्यसनाधिनता, मेंदू आकुंचन पावणे, मेंदूपेशी खराब होणे, अशी अल्झायमरची कारणं आहेत.


जगभरात अल्झायमरचे साडे पाच कोटी रुग्ण आहेत.. 2030 मध्ये हीच संख्या वाढून 7 कोटी 80 लाख होण्याचा अंदाज आहे.. तर 2050 पर्यंत अल्झायमर 13 कोटी 90 लाख लोकांना विळखा घालू शकतो, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केलीय. 


Ganesh Chaturthi 2023: यंदाच्या गणेश चतुर्थीला बनवा हेल्दी मोदक, अजिबात वाढणार नाही वजन


अल्झायमरची लक्षणे साधारण 50 ते 60 या वयात दिसतात. मात्र हल्लीच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जिवनात तरुणांनाही अल्झायमरचा विळखा बसतोय. जर तुम्हीही फोन उचलण्यापासून ते जेवणापर्यंतच्या छोट्या छोट्या गोष्टी विसरत असाल, तारखा किंवा घटना विसरत असाल तर त्यांना हलक्यात घेऊ नका.. त्वरीत डॉक्टर्सकडे जा, असा सल्ला मेंदू विकार तज्ञ डॉ जीवन राजपूत यांनी दिला आहे.