Sex And Health : लैंगिक संबध अर्थात सेक्स ही प्रत्येक जोडप्याच्या आयुष्यातील अत्यंत खाजगी गोष्ट. एखाद्या जोडप्यातील नातेसंबध अधिक घट्ट आणि विश्वासपूर्ण बनवण्यासाठी सेक्स ही खूपच महत्वाची गोष्ट आहे. एकमेकांच्या सहमतीने जोडीदार जवळीक साधतात. जेव्हा इच्छा होईल तेव्हा एखादं जोडपं शारिरीक संबध प्रस्थापित करतं.  यामुळे सेक्स कोणत्या वेळात करावा अशी निश्चित वेळ नाही. बहुकेत जोडपी ही रात्रीच्या वेळेत सेक्स करतात. मात्र, रात्री व्यतीरीक्त अशा काही वेळा आहेत. ज्या वेळेत सेक्स केल्यास शरीराला जबरदस्त फायदे होऊ शकतात (Sex And Health). 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवीन संशोधनानुसार रात्री पेक्षा पहाटेची वेळ ही सेक्स करण्यासाठी सर्वात फायदेशीर वेळ मानली जाते. पहाटे सेक्स केल्यास तुमचा मूड रिफ्रेश होतो. पहाटेच्या वेळेत सेक्स केल्याने रोग प्रतिकार शक्ती वाढते.  आरोग्याला अनेक फायदे देखील होतात. 
स्मरणशक्ती वाढण्यास मदत 


पहाटे सेक्स केल्यास स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. पहाटेच्या वेळेस सेक्स केल्याने मेंदूला सेक्स हार्मोन्स तयार करण्यास उत्तेजन मिळते. या हार्मोन्समुळे तुम्ही दिवसभर सतर्क राहता. अनेक गोष्टी सहज लक्षात ठेवण्यास मदत होते.


तारुण्य अधिक काळ टिकते


पहाटेच्या वेळेस सेक्स करण्याचा आणखी एक फायदा म्हणजे तुमचं तारुण्य अधिक काळ टिकते. पहाटे सेक्स केल्याने रक्ताभिसरण सुधारते.  शरीरातील इस्ट्रोजेनची पातळी वाढण्यास मदत होते. यामुळे वृद्धत्व टाळण्यास मदत होते. त्वचा आणि केस निरोगी राहतात. 


हृदयविकाराचा धोका कमी होतो


अनेक संशोधनातून असे दिसून आले आहे की आठवड्यातून किमान 3 वेळा सेक्स केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो.  त्यातच पहाटेच्या वेळेत सेक्स करणाऱ्यांना हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका 50% पर्यंत कमी होतो. विशेषतः सकाळची वेळ यासाठी सर्वोत्तम मानली जाते.


तणावापासून मुक्ती


पहाटे सेक्स केल्याने तणावापासून मुक्ती मिळण्यास मदत होते. एकदा पहाटे सेक्स केल्याने 7 दिवसांचा ताण कमी होतो असेही अनेक अभ्यासांमध्ये सिद्ध झाले आहे. पहाटे सेक्स केल्याने दिवसभर मूड चांगला राहतो.


शुक्राणूंची गुणवत्ता सुधारते


पहाटेच्या वेळेस सेक्स केल्याने पुरुषांच्या शुक्राणूंची गुणवत्ता देखील सुधारते. यामुळे महिलांच्या गर्भधारणेची शक्यता वाढते आणि प्रोस्टेट कर्करोगाचा धोका कमी होतो. 


30 मिनिटे व्यायाम केल्याप्रमाणे फायदा मिळतो


पहाटे सेक्स केल्याने 30 मिनिटे व्यायाम केल्याप्रमाणे फायदा मिळतात. पहाटे सेक्स केल्याने अर्ध्या तासाच्या व्यायामा इतक्याच कॅलरी बर्न होतात. सेक्स केल्याने पुरुषांच्या 240 तर महिलांच्या 180 कॅलरीज बर्न होतात. पहाटे सेक्स केल्याने शरीरात ऑक्सिटोसिन आणि डोपामाइन नावाचे सेक्स हार्मोन्स वाढतात, ज्यामुळे लैंगिक इच्छा वाढते.