नवी दिल्ली : आयुर्वेदात त्रिफळाचे खूप महत्त्व आहे. साधारणपणे याचा बद्धकोष्ठतेवर फायदा होतो, हे अनेकांना माहिती आहे. परंतु, याव्यतिरिक्तही याचे अनेक फायदे आहेत. तर जाणून घेऊया त्रिफळाचे आरोग्यदायी फायदे...


अशक्तपणावर फायदेशीर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शारीरिकरित्या कमकूवत असणाऱ्या व्यक्तीसाठी त्रिफळा रामबाण ठरते. याचे सेवन केल्याने स्मरणशक्ती सुधारते. दुर्बलता कमी होते. हरडा, बेहडा, आवळा, तूप आणि साखर यांच्या सह त्रिफळाचे सेवन केल्यास अतिशय फायदेशीर ठरते.


रोगप्रतिकारकशक्ती वाढते


त्रिफळाच्या सेवनाने रोगप्रतिकारकशक्ती वाढते. मात्र यासाठी त्रिफळाचे सेवन नियमित करणे आवश्यक आहे.


उच्च रक्तदाबावर गुणकारी


त्रिफळाचे सेवन केल्याने हृदयरोग, मधुमेह आणि उच्च रक्तदाब यावर फायदा होतो. मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या वाढत्या स्तरामुळे हैराण असाल तर 3-4 ग्रॅम त्रिफळा चूर्ण दूधात घालून दररोज रात्री झोपण्यापूर्वी सेवन करा. नक्कीच आराम मिळेल.


बद्धकोष्ठतेवर फायदेशीर


त्रिफळा चूर्णाचे महत्त्वाचा गुण म्हणजे यामुळे बद्धकोष्ठतेवर आराम मिळतो. आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत खाण्या-पिण्याच्या वेळा नियमित नसतात, ताण-तणाव तर कायम असतोच. त्यामुळे अधिकतर लोक बद्धकोष्ठतेने हैराण आहेत. हा त्रास असणाऱ्यांनी कोमट पाण्यात त्रिफळा चूर्ण घालून नियमित घ्या. 


नेत्रविकारांवर आराम


त्रिफळा चूर्ण पाण्यात घालून त्याने डोळे धुतल्याने डोळ्यांचे त्रास दूर होतात. मोतीबिंदू, डोळ्यांची जळजळ, इतर दोष कमी करण्यासाठी 10 ग्रॅम गायच्या तूपात 1 चमचा त्रिफळा चूर्ण आणि 5 ग्रॅम मध घालून त्याचे सेवन करा.


त्वचारोगावर परिणामकारक


खाज, जळजळ, फोड्या यांसारख्या समस्यांवर त्रिफळा परिणामकारक ठरते. यासाठी सकाळ-संध्याकाळी 6-8 ग्रॅम त्रिफळा चूर्ण खाल्याने फायदा होतो. एक चमचा त्रिफळा चूर्ण एक ग्लास पाण्यात 2-3 तास भिजत ठेवा. त्यानंतर त्या पाण्यात गुळण्या करा. त्यामुळे तोंडाचे विकार दूर होण्यास मदत होईल.


डोकेदुखीवर आराम मिळेल


त्रिफळा, हळद, कडूलिंब यांच्या साली काढून पाण्यात उकळवा. हे पाणी गाळून सकाळ-संध्याकाळ गुळ किंवा साखरेसोबत प्या. डोकेदुखीवर आराम मिळेल.


जाडेपणावर उपयुक्त


जाडेपणामुळे त्रासलेले असाल तर त्रिफळाचे सेवन तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. यासाठी त्रिफळाच्या कोमट काढ्यात मध घालून प्या. त्यामुळे चरबी कमी होते.