Woman removed both her breasts : अमेरिकेच्या (America) फ्लोरिडामध्ये एका 28 वर्षीय महिलेने केलेल्या कृत्याने तुम्हीही हैराण व्हाल. कॅन्सर (Cancer) होऊ नये म्हणून या महिलेने तिचे दोन्ही ब्रेस्ट (removed both her breasts) म्हणजेच स्तन काढून टाकले आहे.  स्टेफनी जर्मिनो असं या महिलेचं नाव असून कॅन्सरच्या धोक्यामुळे तिने हा निर्णय घेतला आहे. मुळात जेव्हा ती 27 वर्षांची होती त्यावेळी तिच्यामध्ये BRCA1 जीन म्यूटेशनची पुष्टी झाली होती. तिची 77 वर्षीय आजी टेरेसा आणि 53 वर्षीय गेब्रिएला या दोघी BRCA1 पॉझिटीव्ह होत्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

BRCA1 जीन मध्ये म्युटेशन म्हणजे, एका प्रकराचं परिवर्तन असनू यामुळे ब्रेस्ट कॅन्सरचा धोका उद्भवतो. सर्व महिलांमध्ये BRCA1 आणि BRCA2 जीन असतात. मात्र ज्या महिलांमध्ये जीन म्युटेशन होतं, त्यांना ब्रेस्ट कॅन्सरचा धोका अधिक असतो. 


BRCA1 जीन पॉझिटिव्ह आल्यानंतर घेतला निर्णय 


BRCA1 जीन म्यूटेशनची पुष्टी झाल्यानंतर स्टेफनीने वयाच्या 27 व्या वर्षी कॅन्सरला रोखण्यासाठी डबल मास्टेक्टॉमी (दोन्ही स्तन काढून टाकण्याची प्रक्रिया) करण्याचा निर्णय घेतला.


स्टेफनीला एक मुलगा आहे आणि तिच्या म्हणण्यानुसार, मी खूप भावूक झाले होते, मात्र मृत्यूच्या शिक्षेचा विचार केला नाही.  मला माहिती होती माझ्या घरात ब्रेस्ट कॅन्सरचा इतिहास आहे. माझ्या आजीला 2 वेळा कॅन्सर झाला होता. जेव्हा मी केवळ 15 वर्षांची होती तेव्हा माझ्या आईने मला सांगितलं की ती BRCA1 जीन पॉझिटीव्ह आहे. त्यामुळे या गोष्टीचा मलाही अधिक धोका होता. अशा परिस्थितीत मला ब्रेस्ट आणि ओवेरियन कॅन्सरचा 87 टक्के धोका असल्याची शक्यता होती. 


Flat Chest ठेवायला प्राधान्य देते स्टेफनी


स्टेफनीने अधिक महिलांप्रमाणे ब्रेस्ट इम्प्लांट करण्याऐवजी फ्लॅट चेस्ट ठेवण्यास प्राधान्य दिलं आहे. सामान्यतः महिला सर्जरीनंतर ब्रेस्ट इम्प्लांट करण्याकडे भर देतात. 


स्टेफनीच्या म्हणण्यानुसार, ब्रेस्ट इम्प्लांटबाबत विचार केल्यानंतर मी ठरवलं की, मी फ्लॅट चेस्ट ठेवणार आहे. सहाजिकच माझं केवळ स्तनांवर प्रेम नव्हतं. मुळात मी कधीही स्तनांना महिलेची ओळख या नजरेने पाहिलं नाही. त्यामुळे मला हा निर्णय घेणं तितकंस कठीण झालं नाही. इतर महिलांनी देखील ब्रेस्ट काढून टाकल्यावर ब्रेस्ट इम्प्लांटबाबत अधिक ताण घेऊ नये.


स्टेफनी 'बूबलेस बेब्स' म्हणून सोशल मीडिया प्रसिद्ध


गेल्या वर्षी स्तन काढून टाकल्यानंतर स्टेफनीने तिचा प्रवास Instagram आणि TikTok वर शेअर केलेत. @theebooblessbabe ने प्रसिद्ध असणारी स्टेफनी BRCA जीनबाबत आता जागरूकता पसरवते. 


BRCA जीन टेस्टिंग नेमकी काय?


डॉक्टर एका ब्लड टेस्टच्या माध्यमातून BRCA जीम म्युटेशनची तपासणी करतात. ज्यामध्ये लॅबमध्ये एक जेनेरिक एनालिसिस केलं जातं. इंग्लंडच्या नॅशनल हेल्थ सर्विस (NHS) च्या म्हणण्यानुसार, जर कोणाच्या कुटुंबामध्ये ब्रेस्ट आणि ओव्हेरियन कॅन्सरचा इतिहास असेल तर त्यांनी BRCA जीन टेस्ट करून घ्यावी.