या `६` जबरदस्त उपायांनी दूर करा बद्धकोष्ठतेची समस्या!
पोट नियमित साफ होणे हे उत्तम आरोग्याचे लक्षण आहे.
मुंबई : पोट नियमित साफ होणे हे उत्तम आरोग्याचे लक्षण आहे. धावपळीची जीवनशैली, कामाचा ताण, खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी आणि वेळा यामुळे आजकालच्या लोकांना बद्धकोष्ठतेची समस्या होणे सामान्य झाले आहे. पण यावर वेळीच उपचार न केल्यास हा त्रास अधिक वाढतो. पण यावर अगदी साधेसोपे उपाय करून ही समस्या दूर करता येऊ शकते. जाणून घेऊया काही उपाय...
लिंबू
पचनक्रिया सुरळीत करण्याचे कार्य लिंबू करते. यामुळे शरीरातील विषद्रव्ये बाहेर पडतात. सकाळी उठल्यावर लिंबूपाणी घेतल्यास बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. लिंबूपाण्याऐवजी तुम्ही लेमन टी ही घेऊ शकता.
पुदीना आणि आलं
पुदीना आणि आलं घालून चहा घेतल्यास बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत होते. बद्धकोष्ठतेवर आल्याच्या चहा घेणे हा एक उत्तम उपाय आहे.
गुळ
रात्री झोपण्यापूर्वी गुळ खाल्यास बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. व्हिटॉमिन्स आणि मिनरल्सने युक्त असा गुळ खाल्याने बद्धकोष्ठतेच्या समस्येवर आराम मिळतो.
कॉफी
कॉफी प्यायल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास तुम्हाला सतावणार नाही.
आलुबुखार
हे आंबट गोड फळ पोटासंबंधित आजार दूर करण्यास मदत करते. रोज ३ ग्रॅम आलुबुखार खाल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत होते. कारण आलुबुखारमध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात.
फिरणे
रोज १५ मिनिटं फिरल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास खूप मदत होते. म्हणून जेवल्यानंतर १५ मिनिटे चाला.