मुंबई : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या एन्ट्रीने भारतात देखील दहशत निर्माण केली आहे. दक्षिण आफ्रिकेहून बंगळूरूमध्ये आलेले दोन व्यक्ती पॉझिटीव्ह आढळल्याने चिंतेत आणखीन भर पडली आहे. अशातच आता चंदीगढमध्येही दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आढळून आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्यांदा मिळालेल्या माहितीनुसार, या व्यक्तीसोबतच त्याच्या कुटुंबातील एक सदस्य आणि घरात काम करणारी महिला पण पॉझिटीव्ह आहे. मात्र त्यानंतर या दोघांचाही रिपोर्ट निगेटीव्ह आढळून आला आहे.


दक्षिण आफ्रिेकेवरून आलेल्या 39 वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर त्याला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. यासोबत या व्यक्तीच्या कुटुंबातील एकाचा कोरोना रिपोर्ट येणं बाकी आहे. 


कोरोनाच्या प्रोटोकॉलनुसार, पॉझिटीव्ह येणाऱ्या व्यक्तीला योग्य त्या सुविधांसोबत आयसोलेशमध्ये ठेवावं. इतकंच नाही तर संक्रमित आढळलेल्या त्या व्यक्तीचे कोरोना नमुन्याला जीनोम सिक्वेंसिंगसाठी दिल्लीतील एनसीडीसी प्रयोगशाळेत पाठवण्यात यावं.


मथुरेत एकूण चार परदेशी प्रवासी कोविड पॉझिटिव्ह आढळले आहेत. या यादीत एक प्रवासी ऑस्ट्रियाचा, एक स्पेनचा आणि तर एक स्वित्झर्लंडचा आहे. हे सर्व प्रवासी मथुरेतील वृंदावनला भेट देण्यासाठी आले होते. मात्र सध्या या सर्व प्रवाशांना विलग करण्यात आलं असून ते ज्या भागात राहत होते तो भागही कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.


दक्षिण आफ्रिकेसह इतर देशांमध्ये कोरोना विषाणूचा एक नवीन प्रकार ओमिक्रॉन दिसून लागल्यानंतर केंद्र सरकारने सोमवारी ट्रॅवर एडवायजरी जारी केली आहे. सरकारने भारतात येणाऱ्या सर्व प्रवाशांना आवश्यक प्रोटोकॉल पाळण्याचा सल्ला दिला आहे.