उतरत्या वयातही हवाय पंचवीशीच्या तरूणासारखा स्टॅमिना? आहारात करा `या` गोष्टींचा समावेश, सद्गुरूंनी दिल्या टीप्स
Anti Aging Tips By Sadhguru: सध्या आपली सर्वांचीच जीवनशैली ही बदलत जाते आहे त्यामुळे अशावेळी आपली लाईफस्टाईल आरोग्यदायी कशी बनवावी असा प्रश्न असतो. त्यातून उतार वयातही चिरतरूण दिसण्यासाठी काय करावं याचीही जोरात चर्चा असते.
Anti Aging Tips By Sadhguru: सोशल मीडियावर चर्चा असते ती म्हणजे लवकर म्हातारं होऊ नये म्हणून काय करावं लागेल हे शोधायचाही अनेक लोकं प्रयत्न करताना दिसतात. आजकाल सगळ्यांचीच जीवनशैली ही बदलली आहे. त्यामुळे आपल्याला नकळत आपल्यालाच अनेक वाईट सवयीही लागतात. त्यातून मार्ग कसा काढावा हे आपल्याला कळत नाही. सध्या वय वाढलं नसलं तरीसुद्धा अनेकांना आपण म्हातारेच झालो आहोत असंच वाटू लागते. त्यामुळे अशावेळी ही माणसं फारच घाबरून जातात. तेव्हा काय करावं हे त्यांना कळतचं नाही.
पहिली गोष्ट अशी की मनानं तरूण असणं हे फार महत्त्वाचे आहे. त्यातून सध्या तरूण वयातच थकलेपणा, चिडचिड, अंगदुखी, कंबरदुखी अशा अनेक समस्या सतावू लागल्या आहेत. त्यामुळे अनेकांना तरूण वयातच म्हातारं झाल्यासारखं वाटतं. परंतु जर का तुम्हाला कायमच चिरतरूण राहायचे असेल तर त्यासाठी आपल्याला काही गोष्टी करणं हे मस्टच आहे. सद्गुरू यांच्या सल्ल्यानुसारही तुम्ही आपल्या आहारात चांगल्या गोष्टींचा समावेश करून घेऊ शकता.
सध्याचे जीवन हे प्रचंड धकाधकीचे आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यासाठी आपल्याला आपल्या सवयी या बदलणं आवश्यक आहे. दारू, सिगारेट, व्यसन यांची सवय सोडून द्यावी. त्यातून सतत बाहेरचे खाणंही टाळावे. यानं आपले वजन वाढू लागते आणि त्याचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो. तेव्हा अशावेळी जास्त करून आरोग्यदायी जेवण खाणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यातून फक्त आरोग्यादायी जेवणच नाही तर त्याप्रमाणे व्यायामही करणं फार महत्त्वाचे आहे. त्यातून काही जणं हे फक्त व्यायाम करतात आणि हेल्थी जेवण खात नाही. तर काही जणं फक्त हेल्थी फूड खातात किंवा डाएट करतात परंतु एक्सरसाईज, किंवा व्यायाम करत नाहीत. परंतु असं करून चालणार नाही. यासाठी योग्य त्या गोष्टी पाळणं हे अत्यंत महत्त्वाचं असते. व्यायाम आणि हेल्थी फूड याचा योग्य तो समतोल राखत आपण आपल्याला लाईफस्टाईलकडे लक्ष दिले पाहिजे.
हेही वाचा: दूरदर्शनवर दर रविवारी पौराणिक मालिकातील 'हा' चिमुरडा, अचानक झाला कंपनीचा सीईओ
सद्गुरूंनी कोणत्या गोष्टी खाव्यात याबद्दल टीप्स दिल्या आहेत. त्यांचे सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओही व्हायरल होत असतात.
आपल्या आहारात पांढऱ्या भोपळ्याचा समावेश करून घ्यावा. त्याच्या ज्यूसचे सेवन करावे.
त्यासोबत तुम्ही शेंगदाणे खावेत. यात यात व्हिटॅमिन बी, कॉम्प्लेक्स, नियाचिन, रिबोफ्लेविन, थियामिन, विटामिन B6, विटामिन B9, पेटोंथेनिक अॅसिड, असते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)