मुंबईः रोज एक सफरचंद खाल्ल्याने डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही (An apple a day keeps the doctor) असं म्हटलं जातं. कारण सफरचंद खाल्ल्याने अनेक रोगांचा धोका टळतो, परंतु बरेच लोक सफरचंद खातात मात्र त्याची साल काढून टाकतात.मात्र तुम्हाला माहिती नसेल, सफरचंदाच्या सालीचे शरीर आश्चर्यकारक परिणाम होतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


वजन कमी करण्यासाठी सफरचंदाच्या सालीचा वापर होतो. सालीमध्ये भरपूर प्रमाणात ursolic acid आढळते, जे पोटावरील चरबी कमी करण्यास आणि वजन कमी करण्यास मदत करते. 



ज्यांना श्वासोच्छवासाचा त्रास होत असेल त्यांनी सफरचंद सालींसोबत खावे कारण या सालींमध्ये क्वेर्सेटिन नावाचे तत्व असते, जे श्वासोच्छवासाच्या समस्या दूर करते.



डॉक्टर नेहमी सफरचंद सालीसह खाण्याचा सल्ला देतात कारण संपूर्ण सफरचंदात सुमारे 8.5 मिलीग्राम व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए असतात. साल काढून टाकल्यावर, ते कमी राहतात


एका मध्यम आकाराच्या सफरचंदात सुमारे 4.5 ग्रॅम फायबर असते, परंतु जेव्हा या सफरचंदाची साल काढली जाते तेव्हा या फळातील फायबरचे प्रमाण फक्त 2 ग्रॅम राहते. याचा अर्थ सफरचंदाच्या सालीमध्ये फळापेक्षा जास्त फायबर असतं, जे आरोग्यासाठी आवश्यक असतं.



अमेरिकेच्या कॉर्नेल युनिव्हर्सिटीच्या संशोधनात हे सिद्ध झाले आहे की सफरचंद सालीसह खाल्ल्याने पोट, यकृत आणि स्तनाच्या कर्करोगाच्या पेशी निर्माण होण्याचा धोका कमी होतो.