मुंबई : कोरोना व्हायरस महामारीचा अनेकांना फटका बसला आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान मुलांच्या शैक्षणिक वर्षाचं झालं आहे. गेल्या वर्षांपासून शाळा बंद आहेत. काही राज्यांमध्ये कोरोना प्रोटोकॉलसह शाळा उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र राजधानी दिल्लीसह बहुतेक राज्यांमध्ये अजूनही लहान मुलांसाठी शाळा बंद आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र लहान मुलांच्या शाळा सुरु करायच्या का नाही याबाबत पालकांचं मत समोर आलं आहे. एका सर्वेक्षणात आजच्या परिस्थितीत लसीकरण न करता मुलांना शाळेत पाठवण्यास पालक तयार आहेत का हे समजण्यास मदत झालीये.


विनालस मुलांना शाळेत पाठण्यास पालक आहेत का तयार?


लहान मुलांसाठी कोरोना लस आणण्याच्या योजनेवर सरकार जलदगतीने काम करतंय. दरम्यान, लहान मुलांसाठी शाळा उघडण्याच्या योजनेबाबत पालकांसमोर सतत चिंता असते. पॅरेंटिंग ब्रँड रॅबिटॅटने केलेल्या सर्वेक्षणात असं दिसून आलं आहे की, 10 पैकी 9 पालक आपल्या मुलांसाठी लसीची वाट पाहत आहेत. रॅबिटॅटने आपल्या मुलांच्या लसीकरणाबद्दल पालकांच्या मतांचे सर्वेक्षण केलं आणि पालकांनी लसीकरण न करता मुलांना शाळेत पाठवण्यास इच्छुक आहेत का याचं सर्वेक्षण केलं.


मुलांच्या शाळा उघडण्याबाबत पालक खूप चिंतित दिसत असल्याचं चित्र आहे. लसीकरण न करता ते आपल्या मुलांना शाळेत पाठवतील का, असं सर्वेक्षणात विचारण्यात आले. यावेळी 89.7% पालकांना लसीकरणाशिवाय मुलांना शाळेत पाठवायचं नाहीये, तर 10.3 टक्के लोकांनी सांगितलं की ते मुलांना लसीकरण न करता शाळेत पाठवू शकतात.


इतके पालक लसीकरणाच्या विरोधात


या सर्वेक्षणात असं दिसून आलं की, बहुतेक पालक लसीकरणाच्या बाजूने आहे. 10 पैकी फक्त 1 पालकांना आपल्या मुलांना लस द्यावी असं वाटत नाही. सर्वेक्षण केलेल्या एकूण पालकांपैकी 1.2% पालकांनी मुलांसाठी लसीकरण आवश्यक मानलं नाही, 5.6% पालक याबाबत गोंधळात पडले आणि 93.2% पालकांचा असा विश्वास आहे की मुलांसाठी लसीकरण अत्यंत महत्वाचं आहे.


किती लोकांना कोणती लस हवी?


पालकांना कोणती लस हवी हे देखील विचारण्यात आलं. यामध्ये 57.4% जणांनी कोविशील्ड, 22.2% कोवॅक्सिन, 14.8% स्पुतनिक आणि 5.6% लोकांनी या तीनपैकी कोणत्याही लसीला पसंती दिली नाही.