मुंबई : घराबाहेर पडताना अनेकांना पाण्याची बाटली सोबत ठेवण्याची चांगली सवय असते. त्यामुळे बाहेरचं पाणी प्यावं लागत नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आणि समजा एखाद्या दिवशी बाटली न्यायला विसरलो तर आपण प्लॉस्टिक बॉटल्समध्ये विक्रीसाठी असलेले पाणी आपण विकत घेतो. पण ही चांगली सवय खरंच चांगली आहे का ? प्लॉस्टिक हे आरोग्यासाठी तसंच पर्यावरणासाठी देखील हानिकारक आहे. त्यामुळे न्यायालयाने त्यावर बंदी घातली आहे. पण तरी देखील प्लॉस्टिकचा वापर सर्रास होतो. पण खरंच प्लॉस्टिकच्या बाटलीतून पाणी पिणे सुरक्षित आहे का ? 


प्लॉस्टिकच्या बाटलीतून आरोग्यास हानिकारक अशी रसायने बाहेर पडतात. बाटलीच्या तळाशी असलेले त्रिकोणाचे चिन्ह दर्शवते की, बाटली बनवण्यासाठी कोणत्या प्रकारचे प्लॉस्टिक वापरले गेले आहे आणि ती अजून किती वेळा रियुज म्हणजे पुन्हा वापरता येईल. 


सूर्य, उष्णता, ऑक्सिजन किंवा उच्च तापमानाच्या संपर्कात येताच अशा बाटलीतुन पाण्यामध्ये विषारी द्रव्य बाहेर पडतात. 


दुसऱ्याने वापरलेल्या बाटलीने पाणी पिणे चुकीचे आहे. कारण पृथ्वीवर जेवढी संख्या माणसांची आहे त्यापेक्षा जास्त जिवाणू एका माणसाच्या तोंडात असतात. त्यामुळे दुसऱ्याने वापरलेल्या बाटलीतून पाणी पिण्यास टाळावे.


पॉलीथिलीन आणि पॉलीप्रॉपिलीनने बनलेल्या बाटल्या अनेक वापरांसाठी उपयुक्त आहेत. पण जर त्यात नेहमी थंड पाणी साठवून ठेवलं आणि त्यांना नियमितपणे निर्जंतुक करत राहिलं  तरच त्या सुरक्षित असतात.


तसेच बाटली नेहमी कोमट पाणी, विनेगर किंवा अँटीबॅक्टेरिअल माऊथवॉशने स्वच्छ करत रहावी. 


पाण्याच्या बाटलीचा पुनर्वापर करणे, हा मोठा धोका?
मिनरल वॉटर घेतल्यानंतर तुम्ही त्या बाटलीचा पुनर्वापर करत असाल तर ते चुकीचे आहे. कारण प्लॉस्टिकच्या बाटलीतील पाणी जर तुम्ही कोणासोबत शेयर केले तर त्यामुळे बॅक्टरीया पसरू शकतात, ते तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते. प्लॉस्टिक बाटलीचा पुनर्वापर केला तर ते तुमच्या आरोग्यासाठी घातक आहे. कारण प्लॉस्टिक बाटलीमध्ये हानिकारक रसायने असतात जे तुमच्या पिण्याच्या पाण्यात मिसळतात. मात्र, याचा अर्थ असा नाही की तुम्ही पाण्याचा पुनर्वापर करू शकत नाहीत. परंतू, स्वच्छता पाळणे गरजेचे आहे. जर तुम्ही त्याचा पुनर्वापर करणार असाल तर निदान त्या नीट धुवून घ्या. शक्यतो बाटल्या गरम पाण्याने धुवा.