मुंबई : नवरात्रीच्या उत्सवामध्ये नऊ रंगांची धूम, रास-गरब्याची मज्जा सोबतीला  उपवास  आणि  आदि शक्तीचा  जागर  असतो.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काहीजण  नवरात्रीच्या  नऊ  दिवसांमध्ये  कडक  उपवासासोबत अनवाणी  चालण्याचे  व्रत  पाळतात.  मात्र  अशा प्रकारचे  व्रत  करताना  थोडी  विशेष  काळजी  घेणं  आवश्यक  असते. 


अनवाणी चालण्याने  पायांना  त्रास  होऊ  शकतो. त्यामुळे  तो  टाळण्यासाठी  सकाळी  उठल्यावर  पायाचे  स्टेचिंग  व्यायाम  करावेत. त्यानंतरच  दिवसाची  सुरूवात  करावी.  यामुळे  अचानक  पायांच्या  स्नायूंवर  ताण  येणार  नाही.


शक्य असल्यास  खूप  वेळ  चालणे,  दगदग,  प्रवास  टाळावा. उपवासामुळे  शरीरात  ऊर्जा  कमी  असते.  अति चालल्याने त्रास अधिकच वाढू  शकतो. विनाकारण  थकवा  वाढतो. 
अनवाणी  चालताना  खडबडीत  रस्त्यांवरून  चालण्याऐवजी  सपाट  रस्त्यांवरून चालण्याचा  अधिक  प्रयत्न  करावा.  त्यामुळे  पायांचे,  टाचेचे  दुखणे  वाढणार  नाही.  तसेच  ओल्या जमिनीवरूनही चालणे टाळावे. यामुळे संसर्गाचा धोका  वाढू  शकतो.


अनवाणी  चालल्याने, अति परिश्रमामुळे  पायांना, टाचांना त्रास झाल्यास, वेदना जाणवू लागल्यास पाय कोमट पाणी व मीठाच्या मिश्रणामध्ये बुडवावेत.यामुळे ताण कमी होऊन स्नायू आरामदायी होण्यास मदत होईल. तसेच पोटर्‍यांच्या भागांवर त्रास जाणवत असल्यास तेलाचा  मसाज करावा. 


नियमित  बाहेरून आल्यानंतर  पाय  स्वच्छ  धुऊन  कोरडे  करावेत. पायाला जखम  असल्यास,  चिर  पडलेली  असल्यास  पाय  अ‍ॅन्टिसेप्टीकयुक्त  पाण्याने  स्वच्छ  करणे गरजेचे आहे. अन्यथा  इंफेक्शन होऊन  जखम  चिघळण्याची किंवा त्यातून  काही  त्रास  वाढण्याची  शक्यता  अधिक  असते.  त्यामुळे  धूळ,  चिखल,  घाण  यांपासून  दूर  राहण्याचा  शक्यतो  प्रयत्न करा.


नवरात्री दरम्यान कोणी अनवाणी चालणं टाळावे ?
काही जणांसाठी अनवाणी  चालणं  हा  नवरात्रोत्सवातील एक महत्त्वाचे  व्रत असले  तरीही आरोग्याच्यादृष्टीने, मधुमेही, अर्थ्राईटीस ( सांधे दुखीचा त्रास असणा र्‍यांनी) तसेच Peripheral vascular disease(PVD) रुग्णांनी  अनवाणी चालण्याचे व्रत कटाक्षाने  टाळावे.