हिंगाचा काढा- पोटदुखी, बद्धकोष्ठता दूर करण्याचा रामबाण उपाय
खाण्या-पिण्याच्या अयोग्य सवयी किंवा अनहेल्दी लाईफस्टाईल यामुळे पोटदुखी, बद्धकोष्ठता, अॅसिडिटी यांसारख्या समस्या उद्भवतात.
मुंबई : खाण्या-पिण्याच्या अयोग्य सवयी किंवा अनहेल्दी लाईफस्टाईल यामुळे पोटदुखी, बद्धकोष्ठता, अॅसिडिटी यांसारख्या समस्या उद्भवतात. मग यावर औषधं-गोळ्या घेतल्या जातात. पण यामुळे शरीरावर दुष्परिणाम होतात. म्हणून या समस्यांवर काही घरगुती उपाय करुनही तुम्ही त्यापासून सुटका मिळवू शकता. त्यासाठी रामबाण उपाय म्हणजे- हिंगाचा काढा. त्यामुळे पोटांच्या सर्व समस्यांवर तात्काळ आराम मिळतो. तर जाणून घेऊया हिंगाचा काढा बनवण्याची पद्धत...
घरात बनवलेला हिंगाचा काढा सर्वांसाठी फायदेशीर ठरेल. त्यामुळे पोटातील गॅस, अॅसिडिटी यापासून तात्काळ सुटका मिळेल.
साहित्य-
ओवा- अर्धा चमचा
शतपुष्प- अर्धा चमचा
हिंग- पाव चमचा
काळं मीठ- चवीनुसार
सुंठ- एक तुकडा
ज्येष्ठमध- एक लहानसा तुकडा
कृती
हा काढा बनवण्यासाठी सर्वात आधी वरील सर्व साहित्य २५० मीली लीटर पाण्यात घालून उकळवा. ५ मिनिटे हे चांगल्या प्रकारे उकळवल्यानंतर ते गाळून घ्या. जेवल्यानंतर अर्धा तासानंतर काढा प्या. त्यामुळे पचनतंत्र सुरळीत होईल. लहान बाळाला पोटदुखी किंवा बद्धकोष्ठतेची समस्या असल्यास चमचाभर काढा बाळाला पाजा. ताबडतोब याचा परिणाम जाणवेल.
याशिवाय बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळवण्यासाठी अधिक पाणी प्या. फळे, भाज्या यांचा आहारात समावेश करा. फायबरयुक्त आहार घ्या. तसंच मिनरल्स आणि मॅग्नेशियमचे सेवन करा.