Corona : कोरोनाच्या (Corona) रूग्णांमध्ये आता घट होताना दिसतेय. संपूर्ण जर आता कोरोनाच्या विळख्यातून हळूहळू मुक्त होतंय. असं असतानाच आता एक टेन्शन देणारी बातमी समोर आलीये. ऑस्ट्रेलियातील (Australia) सिडनी शहरात बंदरामध्ये असलेल्या एका क्रूझमध्ये 800 लोकांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब समोर आलीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्य म्हणजे एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रवाशांना संसर्ग झाल्याने एकच खळबळ उडालीये. मॅजेस्टिक प्रिन्सेस असं या क्रूझचं नाव असून ती कार्निव्हल कंपनीची असल्याची माहिती आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर क्रूझला मधूनच पुन्हा परवावं लागलंय. क्रूझ सध्या सिडनीच्या समुद्र किनाऱ्यावर उभी आहे. स्थानिक लोक कोरोनाच्या संसर्गाचा पुन्हा प्रसार होण्याची अपेक्षा करतायत. 


दरम्यान ऑस्ट्रेलियाचे गृहमंत्री क्लेअर ओनील यांनी शनिवारी लोकांना सांगितलं की, कोरोनाचा प्रादुर्भाव क्रूझच्या बाहेर पसरू नये यासाठी पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे.


देशाच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे, कंपनी तसंच त्यांच्या कर्मचार्‍यांसह, क्रूझवरील प्रवासी आणि त्यांच्या क्रू सदस्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोविडची प्रकरणे वाढत आहेत. शुक्रवारी 11 नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलियामध्ये कोविडचे 13,146 नवीन रुग्ण आढळले.