मुंबई : दारुसोबत (Alcohol) अनेकांना आपल्या आवडीनुसार तोंडी लावयला पदार्थ लागतो. कुणी चिकन फ्राय तर कुणी चिप्स खातो. मात्र अशा पदार्थांमुळे तुम्ही तुमच्या आरोग्यासह खेळताय. दारु आरोग्यसाठी हानिकारक असते.  त्यात या दारुसोबत असे पदार्थांचं सेवन आणखी धोकादायक असतं. या पदार्थांमध्ये मिठाचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे दारुसोबत अशा पदार्थांचं सेवन आरोग्याच्यादृष्टीने हानिकारक असतं. ड्रींक एन्जॉय करण्यासाठी बरेच जण असं करतात, मात्र याचा परिणाम हा पोटाला होण्याचा धोका नाकारता येत नाही. तसेच या सवयीचा तोटा अपचन, गॅस यासारखा त्रास असणाऱ्यांना जास्त होतो. (avoid eating bakery and dairy products along with alcohol know what effect on health)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशा पदार्थांमध्ये तेल-मसाल्यांचा समावेश असतो, जे आरोग्यासाठी योग्य नाही.  दारुसोबत चुकीच्या पदार्थांच सेवन हे कधीही चांगलं नाही. दारुसोबत काय खालल्याने आरोग्यावर परिणाम होईल, याची बरेच काळजी घेत नाहीत. त्यामुळे दारु पिताना नक्की कोणत्या पदार्थांचं सेवन टाळायला हवं ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 


दारुसह पोर्क आणि चीज टाळावं


दारुसोबत किंवा त्यानंतर पोर्क (डुकराचं मांस) खाणं चुकीची सवय आहे. ज्यांना अपचनाचा त्रास आहे, त्यांनी असं करणं टाळावं. दारुच्या सेवनानंतर जर भूक लागत असेल, तर प्रोटीनयुक्त आणि ज्यातून फायबर मिळेल असेच अन्न पदार्थ खावेत.


ब्रेड आणि केक 


केक, पेस्ट्री, ब्रेड आणि ब्रेडजन्य पदार्थांमध्ये इस्टचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे दारुसोबत अशा पदार्थांचं सेवन टाळावं. जर तुम्ही जास्त प्रमाणात इस्टचं सेवन करत असाल, तर ते पचायला जातं. परिणामी पोट खराब होऊ शकतं. 


डेअरी प्रोडक्टस टाळा


दररोज दारु पिणारे आणि बिअरचं सेवन करत असाल तर तुम्ही पोटावर अधिकचा बोजा टाकताय. त्यामुळे ड्रींकनंतर डेअरी प्रॉडक्टस टाळायला हवेत. दारुसोबत डेअरी प्रोडक्ट्स खाणं शरीरासाठी फार नुकसानकारक ठरु शकतं. 


चॉकलेट नकोच


चॉकलेटमध्ये असलेलं कॅफीन आणि कोको दारुसह पोटाची वाटू लावू शकतात.  गोड खायचंच असेल तर चॉकलेट आणि मिठाईऐवजी पिठाच्या फायबरयुक्त मिठाई खा. 


सोडियमयूक्त फूड टाळा


साधारणपणे दारुसह चिवडा, शेंगा, बर्गर आणि फ्रेंच फ्रायसारखे पदार्थ चवीने खालल्या जातात. पार्ट्यांमध्येही ड्रींक्ससह अशाच पदार्थांचा समावेश असतो. मात्र या पदार्थांचा तुमच्या प्रकृतीवर वाईटरित्या परिणाम होऊ शकतो. मिठामुळे तहान लागते. परिणामी ही तहान भागवण्यसाठी आणखी ड्रींक्स करतात. या पदार्थांसह ड्रींक केल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.