Alcohol Safety Tips: हल्ली दारू पिणं हे आरोग्यासाठी हानिकारक असते हे आपण नेहमीच जाहिरातींमधून ऐकत असतो. परंतु दारूच्या आहारीही अनेक जण जातात आणि त्यांची दारू सुटता सुटत नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की आपले शरीर एका तासात फक्त एक पेय आणि दिवसातून एकूण 3 पेये (Drinks) पचवू शकते परंतु एकापेक्षा जास्त मानक पेय पिणे नेहमीच धोकादायक मानले जाते. ज्या दिवसापासून तुम्ही अल्कोहोल (Alcohol) प्यायला सुरुवात करता तेव्हापासून त्याचे दुष्परिणाम शरीरावर दिसू लागतात. हे परिणाम लगेच दिसून येतात किंवा दीर्घकाळानेही दिसतात. 


बरेच लोक मर्यादित दारूचे सेवन करतात तर काही लोक दारूचे सेवन अतिप्रमाणतही करतात. पण तुम्ही काही अशा गोष्टी केल्यात तर तुम्ही दारूचे तुमच्या शरीरावर होणारे परिणाम थांबवू शकत नाही पण निदान आटोक्यात तरी आणू शकता. 


1 - एखाद्याने नेहमी निर्धारित प्रमाणापेक्षा जास्त दारू पिऊ नये. जर तुम्ही जास्त प्रमाणात दारूचं सेवन केलं तर त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला हँगओव्हर येऊ शकतो. कोणी दररोज जास्त प्रमाणात मद्यपान करत असेल तर त्याला हृदय, कर्करोग, यकृत, किडनी किंवा मेंदूशी संबंधित आजार होऊ शकतात.


2. अल्कोहोल तुमच्या पोटातून आणि लहान आतड्यातून रक्तप्रवाहात जाते. जेव्हा तुम्ही अल्कोहोल पिण्यास सुरुवात करता आणि जर पोट रिकामे असेल तर अल्कोहोल रक्तप्रवाहात वेगाने जाईल. यामुळे शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात म्हणून मद्यपान करण्यापूर्वी आणि मद्यपान करताना नक्कीच काहीतरी खा. ड्रायफ्रुट्स, कोशिंबीर, शेंगदाणे, पनीर हे वाइनसोबत किंवा त्यापूर्वी खाऊ शकतात.


3. जास्त दारूचे सेवन करू नका जर तुम्ही असे केलेत तर त्याचे दुष्परिणाम तुमच्या शरीरावर दिसू लागतील तेव्हा एका तास एकच ड्रींग सेवन करा. 


4. शक्यतो अल्कोहोलमध्ये एनर्जी ड्रिंक मिक्स करणं टाळा. 


5. दारू पिऊन कधीच गाडी चालवू नका असे केल्यास रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता जास्त असते आणि अपघातात तुमच्यासह इतर लोकांचेही नुकसान होऊ शकते. कुठे जायचं असेल तर घरी जाण्याची आधीच व्यवस्था करा. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ती अवलंबण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 Taas याची पुष्टी करत नाही.