Avoid These Food With Tea : सकाळी उठल्याबरोबर अनेक जण चहाला प्राधान्य देतात. तुमचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर चहा ऐवजी व्यायामावर भर दिला पाहिजे. मात्र, काही लोक आजही सकाळी चहा घेतात. ते एवढ्यावरच थांबत नाहीत, तर चहाबरोबर काहीना काही खात असतात. मात्र, काही गोष्टी चहासोबत घेतल्या तर तुमचे आरोग्य बिघडू शकते, हे लक्षात घ्या.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या देशात चहा प्रेमी खूप आहेत. चहा हे लोकप्रिय पेय झाले आहे. दोन मित्र भेटले की गप्पा मारण्यासाठी चहा घेतात. तर काही लोक दिवसभरातील आळस दूर करण्यासाठी चहाला पसंती देतात. घरी आलेल्या कोणत्याही पाहुण्यांची चहानेही स्वागत केले जाते. लोक दुधाच्या चहासोबत ग्रीन टी, लेमन टी, ब्लॅक टी आणि हर्बल टी इत्यादी पितात. तुम्हीही चहा पिण्याचे शौकीन असाल तर लक्षात ठेवा की चुकूनही काही पदार्थांसोबत चहा पिऊ नये, नाहीतर तब्बेत बिघडली म्हणून समजून जा. चहासोबत कोणते पदार्थ  कधीही खाऊ नयेत, हे जाणून घ्या.


या गोष्टी चहासोबत पिऊ नयेत


थंड वस्तू खाणे टाळा


तुम्ही जर चहा घेत असाल तर काही पथ्य पाळले पाहिजे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, गरम चहा प्यायल्यानंतर किमान अर्धा तास थंड पदार्थ कधीही खाऊ नये किंवा पिऊ नये. यासोबतच चहामध्ये थंड पदार्थ मिसळू नयेत. असे केल्याने पचनक्रियेवर याचा मोठा परिणाम होतो. 


बेसनाचे पदार्थ खाऊ नका


चहा घेताना तुम्ही बेसनाचे कोणतेही पदार्थ खाऊ नका. चहा पिताना बेसनाच्या वस्तू खाऊ नयेत. या दोघांच्या मिश्रणामुळे शरीराची पोषक द्रव्ये शोषण्याची क्षमता कमी होते. यामुळे पोट खराब होऊ शकते आणि पचनसंस्थेमध्ये गडबड होऊ शकते. 


हळद


तुमचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर हळदीचे पदार्थ चहासोबत टाळा. तज्ज्ञांच्या मते, तुम्ही चहा पीत असताना  तुम्ही हळद असलेले पदार्थ खाणे टाळावे. त्यामुळे गॅस-अ‍ॅसिडिटी, बद्धकोष्ठता किंवा जुलाब यासारख्या समस्या उद्भवू शकतात. चहाची पाने आणि हळद एकमेकांच्या विरोधात काम करतात. त्यामुळे याचा परिणाम हा तुमच्या आरोग्यावर तत्काळ होतो.


लिंबू


चहा आणि लिंबू असं एकत्रित घेणे टाळा. वजन कमी करण्यासाठी अनेकांना लेमन टी म्हणजेच लेमन टी प्यायला आवडते. मात्र, सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन करु नये. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, चहाची पाने लिंबूमध्ये मिसळल्याने चहा अॅसिडिक होऊ शकतो. त्यामुळे छातीत सूज, छातीत जळजळ आणि अ‍ॅसिड तयार होण्याच्या समस्या होऊ शकतात. 


लोहयुक्त भाज्या


लोहयुक्त भाज्या चहासोबत कधीही खाऊ नये. तसेच तृणधान्ये, कडधान्ये, काजू यांसारखे लोहयुक्त पदार्थ चहासोबत टाळले पाहिजे. याचे कारण म्हणजे चहामध्ये ऑक्सलेट आणि टॅनिन असतात, त्यामुळे रिअ‍ॅक्शन येऊ शकते. त्यामुळे तुमच्या आरोग्याला मोठा धोका पोहोचू शकतो. त्यामुळे चहासोबत याचे कधीही सेवन करु नये.


 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)