मुंबई : आपली दिवसाची सुरुवातच ब्रश करण्यानेच होते. प्रत्येकाला आपले दात चमकदार व स्वस्थ्य असावे, असे वाटते. पण काही लोकांनाच ब्रश करण्याची योग्य पद्धत माहित असते. काही लोक ब्रश करण्यापूर्वी तो काहीसा ओला करतात. तर काहीजणांना ही सवय नसेल. तर पाहुया ब्रश करण्याची योग्य पद्धत कोणती...?


ही आहे योग्य पद्धत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तज्ञांनी सांगितले की, टुथब्रश कधीच ओला करु नये. असे केल्याचे टुथब्रशचा दातांवर होणारा परिणाम कमी होतो. ब्रश ओला करण्याची सवय असल्यास तो अगदी हलकासा ओला करावा. पण पूर्णपणे ओला करु नये. ब्रश ओला केल्याने टुथपेस्ट काहीशी पातळ होते. खूप पातळ टुथपेस्टमुळे ब्रशिंगची क्षमता कमी होते आणि ते दातांच्या आरोग्यासाठी चांगले देखील नसते.


याचीही खबरदारी घेणे गरजेचे


त्याचबरोबर ब्रश झाल्यानंतर पाण्याने अगदी खळखळून चूळ भरा. त्यामुळे टुथपेस्टचा अंश तोंडात राहणार नाही. तसंच ब्रशवरील बॅक्टेरीया दूर करण्यासाठी तुम्ही जर ब्रश ओला करत असला तर त्याऐवजी ब्रशसाठी योग्य कव्हरचा वापर करा. ब्रश आणि ब्रश कव्हर देखील नियमित बदलणे गरजेचे आहे.