मुंबई : दिवाळीचं आकर्षण हे रंगीत कंदील, पणत्या, रांगोळी, नवे कपडे यांप्रमाणेच या दिवसांमध्ये बनवल्या जाणार्‍या फराळामध्येही असतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजकाल चिवडा, चकली सहज आणि वर्षाच्या बाराही महिने उपलब्ध असतात. पण तरीही दिवाळी फराळाचा भाग म्हणून थोड्या प्रमाणात लाडू, चकल्या, चिवडा करणार असाल तर आरोग्याला त्रासदायक ठरणार्‍या या चूका अवश्य टाळा. 


वर्तमानपत्राचा वापर टाळा - चकल्या तळल्यानंतर त्या वर्तमानपत्रावर काढू नका. कारण वर्तमानपत्राच्या शाईमध्ये घातक घटक असतात. ते चकल्यांमध्ये शोषल्यास आणि शरीरात गेल्यास त्रासदायक ठरू शकते. वर्तमानपत्राऐवजी टिश्यू पेपरचा वापर  करा.


चिवडयामध्ये खूप तेल, खोबरं, शेंगदाणे टाळा. त्यांच्याऐवजी भाजलेल्या सुकामेव्याचा वापर करा. 


शंकरपाळी करताना साखरेऐवजी गूळाचा वापर करा. यामुळे चवही सुधारायला मदत होईल. 


करंज्याची पारी बनवताना मैद्याचा वापर करण्याऐवजी मल्टी ग्रेन पीठाचा वापर करा. बेसनाचा त्रास होत असेल तर रवा आणि सुकामेव्याचा वापर करा.  


चकली, शेव तळल्याने त्यामध्ये खूप तेल शोषले जाते. त्याऐवजी बेक्ड शेव आणि बेक्ड चकलीचा पर्याय निवडा.


फराळ बनवताना एकाच दिवशी सारे पदार्थ बनवण्याची घाई करू नका. सतत तळण्याचे पदार्थ किंवा तेलासमोर बसल्यास त्रास होऊ शकतो.