वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाक घरात करू नका या चूका? जेवण करतानाही अशी घ्या काळजी
स्वयंपाक बनवण्यापासून ते जेवण करण्यापर्यंत अशा कोणत्या चूका आहेत ज्यामुळे लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होत नाही.
वास्तुशास्त्रामध्ये घराच्या प्रत्येक भागात काय असले पाहिजे याबाबत सांगितले गेले आहे. परंतु सुखी आणि आरोग्यदायी जीवनासाठी दररोजच्या जगण्यातील काही गोष्टींकडे लक्ष ठेवणं गरजेचं असतं. स्वयंपाक बनवण्यापासून ते जेवण करण्यापर्यंत अशा कोणत्या चूका आहेत ज्यामुळे लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होत नाही. या चूकांमुळे तुमचे आर्थिक जीवन अडचणीचे होत राहते. वाचा सविस्तर
1. जेवण करताना या चूका करू नका.
जेवताना पूर्वेकडे तोंड करून जेवण करा. पूर्वेला देवतांची दिशा मानले गेले आहे. पूर्वेच्या ऐवजी उत्तर दिशेकडेही तोंड करून जेवल्यास त्याचा लाभ होऊ शकतो. असे केल्याने आजारपण तुमच्यापासून लांब राहील.
2. अन्नाला ब्रम्ह देवता मानले जाते. त्यामुळे प्रयत्न करा की, जेवण करण्याआधी अंघोळ झाली असावी. हात, पाय आणि तोंड धुवून जेवायला बसल्यास व्यक्तीचे आयुष्य वाढते.
3. स्वयंपाक घरातील कोणतेही भांडे, प्लेट तुटली असेल तर तीला लगेच घराबाहेर फेकून द्या. तुटलेले - फुटलेले भांडे घरात ठेऊ नका. तुटलेल्या भांड्यात जेवण केल्याने नशिब खराब होते.
4. जेवढी भूक असेल तेवढेच अन्न प्लेटमध्ये घ्या. अन्न वाया घालू नका. असे केल्यास अन्नाचा अपमान होतो. तसेच संतापात जेवण करू नका. संतापात जेवण सोडू नका.
- आग्नेय दिशेला शक्यतो घरातील स्वयंपाक घर असावे, त्यामुळे घरात सकारात्मकता टिकून राहते.
- ईशान्येला कोणत्याही परिस्थितीत स्वयंपाकघर असू नये.
- वास्तूशास्त्रानुसार स्वयंपाक बनवणाऱ्या व्यक्तिचे तोड पूर्वेकडे असायला हवे.
- वास्तुशास्त्रानुसार केलेला स्वयंपाक संपूर्ण परिवाराचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करतो.
- स्वयंपाक घरात ठेवलेली चुल, (शेगडी) समृद्धीचे प्रतिक असते. त्यामुळे स्वयंपाक झाल्यानंतर शेगडी स्वच्छ करणे गरजेचे आहे.
- सर्वात महत्वाचं म्हणजे स्वयंपाक घराच्या स्वच्छतेकडे लक्ष ठेवा.