Hacks to Lose Belly Fat: हार्मोनल असंतुलन, अयोग्य चयापचय, आनुवंशिकता आणि खराब जीवनशैलीमुळे बेली फॅट वाढू शकतं. अनेक अभ्यासांच्या माध्यमातून असं लक्षात आलंय की, पोटावरील चरबीमुळे आरोग्यास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे अनेक आजार होऊ शकतात. जसं महिलांचं वय वाढत जातं, तसं पोटातील चरबी कंबरेभोवती जमा होऊ शकते आणि इस्ट्रोजेनची पातळी कमी झाल्यामुळे रजोनिवृत्ती जवळ येऊ शकते, ज्यामुळे शरीरातील चरबीवर देखील परिणाम होतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बेली फॅट कमी करण्यासाठी आयुर्वेदिक उपाय


दररोज 12 सूर्यनमस्कार 


हार्मोनल संतुलन, चयापचय आणि आतड्यांद्वारे पोषक द्रव्ये शोषण्यासाठी सूर्यनमस्कार सर्वोत्तम आहे. हे मानसिक आरोग्य, झोप सुधारण्यास मदत होतं. ज्यामुळे पोटाची हट्टी चरबी सहजपणे कमी होण्यास मदत होते.


1000 कपालभाती प्राणायाम


हे रक्त प्रवाह आणि पचन सुधारतं, याशिवाय ते डिटॉक्स देखील करते. पोटाची चरबी जाळण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे. हे मासिक पाळी नियमित करण्यास मदत करते, प्रवाह सुधारते आणि PMS व्यवस्थापित करण्यात फायदेशीर ठरतं.


गरम पाणी पिणं


गरम पाणी तुमची चयापचय क्रिया सुधारते आणि केवळ पोटातूनच नाही तर सर्वत्र चरबी जाळण्यास मदत करते. हे पोट फुगणं, गॅस आणि सतत जड वाटण्याच्या समस्येपासून मदत करतं.


चांगली झोप


जितकी चांगली झोप मिळेल तितक्या लवकर तुमचं वजन कमी होईल. 7-8 तासांची चांगली झोप यकृत डिटॉक्स, हार्मोनल संतुलन, वजन कमी करण्यास आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत करतं.