जयपूर : येथील राष्ट्रीय आयुर्वेद संस्थानच्या युवा महोत्सवात दीड हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दरम्यान सुमारे ८ मिनिटं पंचकर्मातील नस्य विधी करत या आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांनी गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आपले नाव कोरले आहे. 


अनेक आजारांवर आणि प्रामुख्याने श्वसनविकारांमध्ये पंचकर्मातील 'नस्य'विधीचा वापर केला जातो. देशभरातील आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन या विधीचे सादरीकरण केले.


शुक्रवार १५ सप्टेंबर  रोजी  सकाळी ९.२०  ते ९.२८ या काळादरम्यान 'नस्य'विधी करण्यात आला. याची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करत आयुर्वेदीक संस्थानचे प्रमुख डॉ. संजीव शर्मा यांच्याकडे या गिनीज बुक ऑफ वर्ल्‍ड रिकॉर्डचे प्रमाणपत्रक देण्यात आले.  


दशमूळ तेलाचा वापर करून नस्य विधी केला जातो. जुनाट सर्दी, खोकला, अस्थमा  अशा समस्यांवर पंचकर्मातील 'नस्य' विशेष प्रभावी ठरते.