मुंबई : बरेच लोक आरोग्याच्या दृष्टीकोनातून काही पदार्थ किंवा भाज्या कच्या खातात. यामागे त्यांचा असा समज आहे की, गोष्टी कच्च्या किंवा उकडून खाल्यामुळे शरीर चांगले रहाते. परंतु तुम्हाला माहितीय का? असं करणं तुमच्या शरीरासाठी किती चांगलं किंवा वाईट आहे? कारण असे बरेच पदार्थ आहेत, ज्याना कच्चं खाल्याने तुम्हाला समस्या उद्भवू शकतात. त्याचा शरीराला फायदा होण्यापेक्षा यामुळे नुकसान देखील होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या आपण कच्चं खाऊ शकत नाही.


हॉट डॉग्स


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकांना नाश्त्यात किंवा स्नॅक्ससाठी अनेकदा हॉट डॉग किंवा सॉसेज खायला आवडतात. परंतु संशोधनात असे दिसून आले आहे की, हे मांसाहारी कोल्ड कट्स कच्चे खाल्ल्याने पचनावर तसेच आतड्याच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. FDA नुसार, कच्चे आणि पॅकेज केलेले हॉट डॉग खाल्ल्याने लिस्टरिया नावाचा जीवाणू विकसित होऊ शकतो, जो आपण त्याला ग्रील किंवा गरम केल्यामुळे मरतो.


कडू बदाम


कडू बदामात अशा रसायनांचे मिश्रण असते, ज्यामुळे आरोग्याला खूप नुकसान होते. हायड्रोजन सायनाइड आणि हायड्रोसायनिक ऍसिड म्हणून ओळखले जाणारे हे दोन रसायने एकत्रितपणे घातक ठरू शकतात. ज्यामुळे मूठभर कडू बदाम कच्चे खाणे आरोग्यासाठी घातक ठरू शकतात.


बटाटा


स्वादिष्ट, कुरकुरीत आणि मजेदार बटाट्यांबाबत वेगळी ओळख देण्याची काहीही गरज नाही. बटाटा हा बर्‍याच पदार्थांमधील एक महत्वाचा भाग आहे. त्याची खासियत म्हणजे त्या कोणत्याही प्रकारे खाल्ले जाऊ शकते. परंतु त्याला कधीही कच्चं खाऊ नका. कारण म्हणजे बटाट्यामध्ये भरपूर स्टार्च असते, जे पचायला कठीण असते. आपल्या पचनसंस्थेला ते खंडित करणे देखील कठीण होते, ज्यामुळे शरीरात सूज येणे आणि इन्सुलिन देखील वाढते.


याव्यतिरिक्त, हिरव्या रंगाच्या बटाट्यांमध्ये सोलॅनिन नावाचे विष असते, ज्यामुळे विषबाधा होऊ शकते.


सफरचंद


सफरचंद हे स्वादिष्ट आणि सहज उपलब्ध होणारे फळ आहे. हे सहसा कच्चे खाल्ले जाते, परंतु तुम्ही कधी चुकून त्याच्या बिया गिळल्या आहेत का? खरंतर याच्या बियांमध्ये रसायने असतात, जे सायनाइडमध्ये बदलू शकतात. म्हणून, सफरचंद खाण्यापूर्वी, बिया काढून टाकण्याची खात्री करा. नाहीतर यामुळे तुमच्या पोटात झाड येणार नाही, पण यामुळे पोटाला त्रास मात्र नक्की होईल.


राजमा


राजमामध्ये भरपूर फायबर, प्रोटीन आणि अँटीऑक्सिडंट असतात, जे आरोग्यासाठी चांगले असतात. विशेषत: उत्तर भारतात हे जास्त प्रमानात खाल्ले जाते. परंतु राजमा कच्चा खाल्ल्याने पोट खराब होऊ शकते, कारण त्यात फायटोहेमॅग्लुटिनिन नावाचे विष असते, ज्यामुळे पोट फुगणे, अस्वस्थता आणि अन्न विषबाधा होऊ शकते. त्यामुळे ते रात्रभर भिजवून, धुवून, स्वच्छ करून चांगले शिजवून घेणे चांगले.


युका


युक्का ही दक्षिण अमेरिकन भाजी आहे जी नैसर्गिकरित्या जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध आहे, ती दिसताना रताळ्यांसारखी दिसते. परंतु ती गोड नसते. परंतु हे लक्षात ठेवा की, या फळभाजीत रसायने देखील आहेत, जी कच्ची खाल्ल्यास सायनाइडमध्ये बदलू शकतात. त्यामुळे, हानीकारक रसायने नसतील याची खात्री करण्यासाठी ही भाजी खाण्यापूर्वी पूर्णपणे धुऊन, सोलून आणि शिजवून घ्यावी, असा सल्ला दिला जातो.


(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)