मुंबई : वाढत्या वयाबरोबर हाडे कमजोर होतात, हे खरे असले तरी अनेकदा आपली जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी यामुळे हाडे कमकूवत होतात. आजकाल ही समस्या सामान्य झाली असून त्यात जर तुम्हाला या सवयी असतील तर हाडे कमजोर होण्याचा त्रास अधिक वाढू शकतो. त्यामुळे या सवयी वेळीच बदलणे गरजेचे आहे. कोणत्या आहेत या सवयी घ्या जाणून घेऊया... तुम्हाला तर नाहीत ना या सवयी? एकदा तपासून पहा... 


प्रकाशापासून दूर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अधिक काळ सूर्यप्रकाशापासून दूर राहिल्याने शरीरात व्हिटॉमिन डी ची कमतरता भासू लागते. त्यामुळे हाडे कमकूवत होऊ लागतात.


मद्यपान


हाडे बळकट होण्यासाठी कॅल्शियमची आवश्यकता असते. पण अधिक मद्यपानामुळे शरीरात कॅल्शियम शोषून घेण्याची क्षमता कमी होऊ लागते. परिणामी हाडे कमजोर होतात.


मीठ


काही लोक जेवणात अधिक मीठ वापरतात. त्यामुळेही हाडे कमकूवत होतात. कारण अधिक मीठ खाल्याने शरीरातून कॅल्शियम यूरीनसोबत बाहेर पडते. परिणामी हळूहळू हाडे कमजोर होऊ लागतात.


धुम्रपान


धुम्रपान केल्याने हाडांचे नुकसान होते आणि हाडे कमकूवत होऊ लागतात.