टक्कल पडलेल्या मुलांबाबत मुली असा विचार करतात...
टक्कल पडलंय? घाबरु नका...कारण नुकत्याच करण्यात आलेल्या रिसर्चमध्ये टक्कल पडलेल्या मुलांबद्दल सकारात्मक बाब समोर आलीये. टक्कल पडलेल्या मुलांना मुली अधिक पसंत करतात असे एका रिसर्चमधून समोर आलेय.
मुंबई : टक्कल पडलंय? घाबरु नका...कारण नुकत्याच करण्यात आलेल्या रिसर्चमध्ये टक्कल पडलेल्या मुलांबद्दल सकारात्मक बाब समोर आलीये. टक्कल पडलेल्या मुलांना मुली अधिक पसंत करतात असे एका रिसर्चमधून समोर आलेय.
याच कारणामुळे हॉलीवूडमधील ड्वायेन जॉन्सन, विन डिझेलसारखे अभिनेते केवळ टॉप अभिनेतेच नाहीत तर यांचे महिला फॉलोअर्स अधिक आहेत.
पेनेसेल्वेनिया युनिर्व्हसिटीमध्ये केलेल्या रिसर्चमधून ही बाब समोर आलीये. घनदाट केस असलेल्यांच्या तुलनेत टक्कल असलेले लोकांचे व्यरक्तिमत्व अधिक प्रभावशाली मानले जाते. या रिसर्चमध्ये ५५२ पुरुष आणि महिलांचा समावेश होता.
या रिपोर्टमधील माहितीनुसार टक्कल असलेल्या पुरुषांचे वय इतर पुरुषांच्या तुलनेत दोन ते तीन वर्षांनी कमी दिसून येते. तसेच अशा व्यक्ती अधिक तरुण, आकर्षक तसेच समजूतदार असतात.