Bye Bye Yellow Teeth : या फळाच्या सालीचा वापर करून दात चमकतील मोत्यासारखे, फक्त असा करा वापर...
तुम्हीपण पिवळ्या दातांच्या समस्येपासून हैराण झाला असाल तर आता चिंता मिटली. कारण तुम्ही घरच्याघरी अतिशय कमी खर्चात, दात चमकावणारी हर्बल पावडर बनवू शकतात. ही पावडत तुमचे दात चमकावण्यास फायदेशीर ठरू शकते.
Herbal Powder for shining teeth : भारतात विविध प्रकारचं जेवण खायला मिळतं ( Indian food ). भारतीय व्यंजनांमध्ये भारतीय मसाले वापरले ( Indian Masala) असतात यामुळे भारतीय जेवणाला जगात तोड नाही असं बोललं जातं. मात्र अनेकदा हे जेवण केल्यावर आपल्या तोंडाला त्या जेवणाचा वास येतो किंवा मसाल्यांमुळे आपल्या दातांवर पिवळा थर चढतो. या बातमीतून आम्ही दातांवर जमणाऱ्या पिवळ्या थराला कसं घालवता येईल याबाबत घरघुती आणि अतिशय सोपा, कमी खर्चिक उपाय सांगणार आहोत. ही हर्बल पावडर तुम्ही अवघ्या 15 मिनिटांत घरात बनवू शकता. ही पावडर बनवण्यासाठी जास्त खर्च होत नाही. या पावडरच्या वापराने तुमचे पिवळे दात चकाकतील आणि सोबतच तुमच्या हिरड्या देखील मजबूत होण्यास मदत होईल. चला तर मग, जाणून घेऊयात घरच्या घरी दात चमकावणारी हर्बल पावडर बनवण्याची पद्धत, ही पावडर वापरण्याची पद्धत आणि ध्यानात ठेवण्याच्या गोष्टी जाणून घेऊया.
दात चमकावणारी केळीच्या सालांची हर्बल पावडर
साहित्य :
केळीची सालं
कॅल्शियम पावडर - एक चमचा
ऑलिव्ह ऑइल - दोन चमचे
मीठ - एक चमचा
अशी बनवा दातांसाठीची हर्बल पावडर
चमकणाऱ्या दातांसाठी तुम्ही केळीच्या सालाची पावडर बनवू शकतात. यासाठी सर्वात आधी केळीची फ्रेश सालं उन्हामध्ये सुकवून घ्या. ही सालं सुकल्यावर त्यांना दळून त्यांची छान पावडर बनवून घ्या. यानंतर या पावडरमध्ये वरील नमूद सर्व सामग्री मिक्स करा आणि पुन्हा एकदा मिक्सरमधून दळून घ्या. अशाप्रकारे तुम्ही हर्बल पावडर तयार होईल
ही पावडर वापरण्याची पद्धत
या पावडरला तळहातावर घ्या एका बोटाने तुम्ही ही पावडर हिरड्यांवर लावू शकतात. यानंतर ब्रशवर ही पावडर घेऊन चारही बाजूनी दातांची नीट सफाई करा. यानंतर हलक्या कोमट पाण्याने व्यवस्थित चूळ भरा. या पावडरने दातांची सफाई केल्याने दात चमकतात. या पावडरमधील कॅल्शियम तुमच्या दातांना अधिक चमकदार करण्यात मदत करतात, सोबतच तुमचे दात अधिक मजबूत होतात. या पावडरने हिरड्यांवर मसाज केल्यास हिरड्याची मजबूत होतात.
या गोष्टी ठेवा ध्यानात...
खूप जास्त वेळ या पावडरने दात घासू नये, नाहीतर तुमचे दात डॅमेज होऊ शकतात
या पावडरने हिरड्यांची सफाई करतात हलक्या हाताचा वापर करा
केळीची सालं फ्रेश असतील तर अधिक उत्तम, या सालींवर डाग नसावे
( डिस्क्लेमर - वरील बातमी सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैंनदिन आयुष्यात त्याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या )
banana peel herbal powder for shining white theeth full recepie and tips for use