मुंबई : आपल्या त्वचेसाठी कोरफड खूप फायदेशीर ठरतं. त्वचेसाठी तसंच केसांसाठी कोरफडाचे फायदे प्रत्येकाला माहिती आहेत. मात्र तुम्हाला माहितीये का? कोरफडीने तुम्हाला नुकसान देखील होऊ शकतं. फार कमी लोकांना कोरफडीमुळे होणाऱ्या नुकसानीची माहिती असेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरफडीचा वापर ज्यूसच्या स्वरूपातही केला जातो. पण काही आजारांमध्ये कोरफडीचा वापर केल्याने तुमची समस्या आणखी वाढू शकते. गर्भवती महिलांना कोरफडीचा वापर न करण्याचा सल्ला दिला जातो. कारण अशा महिलांवर कोरफडीचे दुष्परिणाम होऊ शकतात. साइड इफेक्ट्समुळे कोरफड वापरण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.  


त्वचेला होतं नुकसान


शुद्ध कोरफड जेल वापरल्याने तुमच्या त्वचेला हानी पोहोचू शकते. कोरड्या त्वचेवर, मुरुमांवर, डागांवर किंवा स्ट्रेच मार्क्सवर बरेच लोक कोरफडीचा वापर करतात. त्वचेवर जास्त प्रमाणात लावल्यास त्वचेचं नुकसान होऊ शकतं. 


कोरफड कापताना अनेक वेळा त्यातून एक पिवळसर द्रव बाहेर पडतो, जो पूर्णपणे काढून टाकणं आवश्यक असते. हा पिवळा द्रव लेटेक्स असतो. याच्या वापरामुळे एक्जिमा, रॅशेस यांसारख्या त्वचेच्या अनेक समस्या उद्भवू शकतात.


अतिप्रमाणात वापर करू नये


कोरफडीचा रस अतिप्रमाणात प्यायल्याने तुमचं आरोग्य बिघडू शकतं. कारण कोणतीही गोष्ट एका मर्यादेत घेणं ठीक आहे. परंतु ते जास्त प्रमाणात घेतल्यास त्याचा त्रास होतो. यामध्ये असे काही घटक आढळतात जे तुमच्या शरीरातील पोटॅशियमचं प्रमाण कमी करतात.