मुंबई : बाराही महिने हमखास मिळणारं एक फळं म्हणजे केळं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केळ्यामध्ये अनेक पोषकघटक असतात. त्यामुळे अवेळी भूक लागल्यास त्यावर  नियंत्रण मिळवण्यासून थेट वजन वाढवण्याचा प्रयत्न करणार्‍यांमध्येही केळ्याचा हमखास समावेश केला जातो. 


आयुर्वेदामध्येही केळं आहारात ठेवल्यास अनेक आरोग्यदायी असल्याचे सांगितले जाते. हाडांना बळकटी देण्यासाठी केळ फायदेशीर आहे. केळ्यामध्ये पोटॅशियम घटक मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे शरीराला कॅल्शियम, पोटॅशियमचा मुबलक पुरवठा होतो.  


निद्रानाशेवर फायदेशीर   


निद्रानाशेचा त्रास हा आजच्या तरूणांमध्ये प्रामुख्याने आढळणारी एक समस्या आहे. त्यामुळे त्यावर मात करण्यासाठी केळं फायदेशीर ठरतं हे तुम्हांला ठाऊक आहे का ? 


निद्रानाशेचा त्रास जाणवत असेल केळं सालीसकट उकळून त्याचा अर्क पिणं  फायदेशीर आहे. सलग आठवडाभर हा प्रयोग केल्यास रात्रीची शांत झोप येण्यास मदत होते. सोबतच तुमच्या दिवसाची सुरूवातही प्रसन्न होईल.   


कसा कराल हा उपाय ? 



एक लहान आकाराचे  पिकलेले केळं आणि दालचिनीचा छोटा आणि कपभर पाण्याची आवश्यकता आहे. पाण्यात दालचिनीचा तुकडा उकळा. पाण्याला उकळी आल्यानंतर केळ्याचे लहान तुकडे सालीसकट पाण्यात टाका. १० मिनिटांनंतर हे पाणी गाळून प्यावे.   


फायदा काय ? 


केळ्याचा अर्क प्यायल्यास शांत झोप लागण्यास मदत होते. अचानक रात्री झोपमोड होत असल्यास त्यावर नियंत्रण मिळवता येते. केळ्याप्रमाणेच त्याच्या सालीदेखील फायदेशीर आहेत. केळ्याच्या सालींमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम आढळते. यामुळे नर्व्हस सिसटिम शांत ठेवण्यास मदत होते .