सौंदर्य खुलवायला मीठ ठरते फायदेशीर
मीठाशिवाय आपण जेवणचा विचारही करू शकत नाही.
मुंबई : मीठाशिवाय आपण जेवणचा विचारही करू शकत नाही. मात्र मीठ आहरात चव वाढवण्याचं काम करत नाही तर त्याचा आरोग्यदायी फायद्यांसाठीही अनेकप्रकारे वापर करता येऊ शकतो. सौंदर्य खुलवण्यासाठीही मीठ अत्यंत फायदेशीर आहे.
चेहर्यासाठी फायदेशीर मीठ
मीठामध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म असतात. यामुळे चेहरा तजेलदार होतो. उन्हाळ्यात त्वचेवर मृत पेशी साचून राहण्याचं प्रमाण अधिक असतं. अशावेळेस डेड स्कीनचा थर नैसर्गिकरित्या हटवण्यासाठी मीठ अत्यंत फायदेशीर आहे.
घरगुती स्क्रब -
मीठामध्ये ऑलिव्ह ऑईल, लॅव्हेंडर ऑईल, बदामाचं तेल मिसळा. या स्क्रबरने चेहरा स्वच्छ केल्यास मृत पेशींचा थर निघून जाण्यास मदत होते.
व्हिटॅमिन्सच्या कमीमुळे अनेकदा नखं कमजोर होतात. अशावेळेस चमचाभर मीठामध्ये, चमचाभर लिंबाचा रस, चमचाभर बेकिंग सोडा आणि कपभर कोमट पाणी मिसळा. ही पेस्ट नखांवर लावल्यास ते मजबूत आणि चमकदार होतात.
दातांचा पिवळेपणा कमी करण्यासाठी एक चमचा मीठ, दोन चमचा बेकिंग पावडर मिसळा. ही पेस्ट टुथब्रशवर घेऊन लावा. यामुळे दात स्वच्छ होतात.