मुंबई : ढेकूण हा एक उपद्रवी कीटक आहे. घरात केवळ ढेकूण आला तर अल्पावधीतच त्यांची संख्या वाढायला फार वेळ लागत नाही. प्रामुख्याने रात्रीच्या वेळेस त्यांचा त्रास वाढतो. बेडमध्ये, चादरीमध्ये असणारे ढेकूण चावल्यानंतर कोणत्याही आजाराचा थेट धोका नसला तरीही त्वचेवर जळजळ, खाज जाणवते. एखाद्या व्यक्तीने सतत त्वचेवर खाजवल्याने त्वचेचे नुकसान होते सोबतच काही बॅक्टेरिअल इन्फेक्शनचा धोका वाढू शकतो. 


ढेकूण चावल्यानंतर काय कराल ? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ढेकूण चावल्यानंतर त्वचेवर जळजळ किंवा लाल चट्टे पाहून घाबरून जाऊ नका. अशावेळेस आईस पॅक किंवा अ‍ॅन्टी ईच क्रीम, लोशन मदत करते. 


ढेकूणापासून बचावण्यासाठी काय कराल ? 


घरात पेस्ट कंट्रोल करा
घरात ओलसरपणा टाळा. 
ढेकणांचा घरात प्रवेश झाला असल्यास नियमित चादरी, उशीची अभ्रकं बदला.
इन्सेक्ट रिपलॅन्टचा वापर करा
ढेकूणांचं वास्तव्य असू शकेल असा भाग नीट स्वच्छ करा. 


खास टीप्स 


नवे कपडे, फर्निचर,सोफा घेताना पुरेशी काळजी घ्या. घरात ढेकणांचा प्रवेश होणार नाही याची काळजी घ्या. घरात पुरेशी स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न ठेवा. यामुळे आपोआपच ढेकणांचा त्रास कमी करण्यास मदत होते. या '5' नैसर्गिक आणि सुरक्षित उपायांंनी दूर पळवा ढेकणांंचा त्रास