Beer चा एक ग्लास शरीरात गेल्यावर काय होतं माहिती आहे का? जाणून घ्या सविस्तर
Beer Benefits : आज बिअर (beer) हे सर्वात आवडते पेय मानले जाते यात शंका नाही. तुम्ही पाहिले असेलच की, दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी अनेकांना थंडगार बिअर पिणे खूप आवडते.
Beer Benefits : अनेकांना रोज ड्रिंक करण्याची सवय असते. कोणाला वाइन प्यायची सवय तर कोणाला साधा लेमन ज्यूस पिण्याची सवय असते. तर काही लोकांना वाटते की बिअर आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. पण, जर तुम्हाला असे वाटत असेल तर ते चुकीचे असेल. कारण बिअर पिण्याचे अनेक फायदे आहेत, पण आपण रोज किती बिअर प्यायली पाहिजे हे बहुतेकांना माहीत नसते.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की बिअरमध्ये अल्कोहोलचे (alcohol) प्रमाण देखील कमी आहे आणि ते इतर मादक पेयांपेक्षा कमी हानिकारक मानले जाते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे बिअर प्यायल्याने अनेक गंभीर आजारांचा धोकाही दूर होतो.
तणाव दूर करण्यासाठी
अल्कोहोल हे आरोग्यासाठी खूप हानिकारक असल्याचं म्हटलं जातं, पण बिअरबाबतच्या अनेक संशोधनांमध्ये ते आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असल्याचा दावा करण्यात आला आहे. जर तुम्ही बिअरचे सेवन मर्यादित प्रमाणात केले तर तुम्हाला त्याचे अनेक फायदे पाहायला मिळतील. काही संशोधनात असे म्हटले आहे की बिअर पिल्याने तणाव, चिंता आणि थकवा या समस्या दूर होतात. परंतु बिअर 350 मिलीग्रामपेक्षा जास्त खाऊ नये.
किडनी स्टोनमध्ये फायदेशीर
पुष्कळ लोक म्हणतात की जर तुम्हाला मुतखड्यापासून लवकरात लवकर सुटका हवी असेल तर तुम्ही बिअरचे सेवन करू शकता. बिअर प्यायल्याने स्टोन फुटतो आणि लघवीद्वारे बाहेर पडतो. म्हणूनच अनेक लोक किडनी स्टोन झाल्यानंतर बिअर पिण्याची शिफारस करतात.
अल्सरमध्ये आराम देते
काही संशोधनांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की 75 मिलीग्राम बिअरचे सेवन केल्याने अल्सरच्या समस्येत खूप आराम मिळतो. पण बिअर फक्त मर्यादित प्रमाणातच प्यायली पाहिजे, त्याचे जास्त सेवन करणे तुमच्या शरीरासाठी खूप हानिकारक ठरू शकते.